प्रतिनिधी सोलापुर -नवीन विडी घरकुल कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील अल्लापक्ष बागवान यांच्या शेतातील विहिरीत एका ३४ वर्षीय इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली .
कुंभारी येथे बागवान यांच्या शेतातील विहीरीत सोमय्या आगय्या वंगारी (वय 34 रा .अविभाग घरकुल कुंभारी ) याचा मुक्तता पाण्यावर तरंगताना आढळून आला.वळसांच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिले. त्याने आत्महत्या केल्याच्या अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास हवालदार शेख करीत आहेत.