मुंबई:- सिनेसृष्टीतील प्रत्येक गोष्ट ही प्रेक्षकांच्या मनावर मोठा प्रभाव निर्माण करते.चित्रपट म्हंटल की समोर येतात प्रमुख अभिनेता आणि अभिनेत्रींची नावं,ज्यांचा चाहता वर्ग सगळ्यात मोठा असतो. चित्रपटातील काही पात्रं ही कायम प्रेक्षकांच्या मनावर कोरली जातात.दशकांपर्यंत ह्या भूमिकेची चर्चा कायम राहते पण याही पेक्षा जी
‘टाईम लेस‘ होतात ती म्हणजे त्या सिनेमातील गाणी.वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या म्हटली जाणारी गाणी आणि त्याचे गायक व संगीतकार अमर होतात.सिनेसृष्टीतील हे गाण्याचं गणित गीतकारांशीवाय सुटतं नाही.
संगीतकार संगीत देतात त्याची चाल ठरवतात,गायक ते म्हणतात हे चित्रपटातील नट व नटीवर आधारीत असतं.गीतकारांचं मात्र तसं नसतं! त्यांना गीत हे संपुर्ण चित्रपट,त्याची कथा, त्यातील संदेश, प्रसंग, नातेसंबंध यागोष्टींची बेरीज करूनचं करावं लागतं.रेडिओवर जेंव्हा कधी गाण्याचा कार्यक्रम लावला जातो तेव्हा त्यात आवर्जुन गितकाराचे नाव सांगितलं जातं. “आइये सुनते हे अगली पेशकश….जिसे गाया हे…संगीत हे….का और बोल हें….” अश्या प्रकारे यातील ‘बोल हे’ हे गीतकारांसाठी वापरले जाते.
सिनेसृष्टीत जितकी प्रसिद्धी अभिनेत्यानां,दिग्दर्शकानां,
संगीतकारानां मिळते तितकीशी गीतकाराला नसते.त्यांच्या आयुष्यात काय चालु असतं काय नसतं हे कोणालाच माहीत नसतं,म्हणुनच आज पाहुयात की कोणते गीतकार किती मानधन घेतात.
१) गुलजार:-
ज्यांचं नावचं #‘ आहे त्यांच्या बद्दल आणखी काय बोलायचं.त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी जी गीते लिहिलीत ती सगळी सदाबहार ठरली.गुलजारजी एक गीत लिहिण्यासाठी १५ ते २०लाख रुपये घेतात.एका ऑस्कर पुरस्कार विजेत्या गीतकारासाठी हे मानधन खूपचं कमी आहे.
२)जावेद अख्तर:-
जोडी मध्ये काम करणाऱ्या जावेदजींनी एकट्यानी सुद्धा आपला जम बसवला.एखाद्या अभिनेत्याप्रमाणे त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे.अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या या गितकारांचे मानधन १५ ते२० लाख रुपये आहे.
३) प्रसून जोशी :-
गजनी,रंग दे बसंती,तारे जमीनपर अशा नावाजलेल्या चित्रपटाचे गीतकार आहेत प्रसून जोशी.फक्त गीतांपुरते मर्यादीत नसुन जाहिरातीसुद्धा गाजवलेल्या आहेत त्यांनी.कोकाकोला साठी (थंडा मतलब कोकाकोला), NDTV साठी(सच दिखाते हे हम) ,सफोला साठी(अभी तो मे जवान हूं).
केंद्रिय फिल्म प्रमाणन बोर्डाचे अध्यक्ष आहेत प्रसून जोशी.
प्रत्येक गीतासाठी ते ८ते१० लाख रु. मानधन घेतात.
४) स्वानंद किरकिरे:-
“अरे भय्या ऑल इस वेल” असं म्हटलं की समोर येतो 3 iditos आणि त्यातील गाजलेली गाणी.या जादुई सिनेमाला गीतकार म्हणुन लाभले स्वानंद किरकिरे त्यांच्या गाण्यात स्वानंद आहे आणि त्यामुळे किरकिरी दुर होते.एक पार्श्वगायक,संवाद लेखक,अभिनेता अशी बहुआयामी प्रतिभा असणारे स्वानंद एक गाण्यासाठी ६ते७ लाख रु मानधन घेतात.
५)इर्शाद कामिल:-
सिनेसृष्टीतील हटके व प्रभावी गीतांची छाप सोडणारे गीतकार म्हणुन इर्शाद कामिलांची ओळख आहे. आशकी-२,रॉकस्टार,कबिरसिंगसारख्या सुपरहीट सिनेमांना यांचे गीत लाभले आहे. एक गीत लिहिण्यासाठी ते ८ते१० लाख रु मानधन घेतात.
६) अमिताभ भट्टाचार्य:-
एक सुप्रसिद्ध गायक म्हणुन गाजलेलं नाव आहे अमिताभ भट्टाचार्य.अनेक पुरस्कार पटकवलेल्या या गितकरांनी अग्निपथ,ये जवानी हे दिवानी सारख्या चित्रपटाला आपले बोल दिले आहेत आणि याकामासाठी ते ७ते८ लाख रु घेतात.
७) मनोज मुनताशीर:-
नुकत्याच घडलेल्या सुशांतसिंग मृत्यु प्रकरणात बिहार पोलिसांना आपले ऑफिस आणि गाडी देण्यासाठी चर्चेत आलेले आहेत हे गीतकार.बाहुबली-२,केसरी अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीत लिहीलेले आहे.एका गीतासाठी ते ५ते८ लाख रु मानधन घेतात.