Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई विमानतळावर बॉम्बची धमकी; संशयित ताब्यात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मुंबई विमानतळावर बॉम्बची धमकी; संशयित ताब्यात

admin
Last updated: 2025/05/27 at 6:22 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, २७ मे: मुंबई विमानतळावर मंगळवारी सकाळी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली. सकाळी ९ च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या एका अज्ञात दूरध्वनीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी दिली गेली. यानंतर विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था अधिकच कडक करण्यात आली असून, सर्व संबंधित यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या.

विमानतळ प्राधिकरणाने मिळालेली माहिती पोलीस, सीआयएसएफ व इतर सुरक्षा यंत्रणांना दिल्यानंतर संबंधित विमानाची झडती घेण्यात आली. मात्र, तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. दरम्यान, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी साकीनाका पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह तपास सुरू केला. धमकीचा फोन करणारा इसम अंधेरी परिसरात असल्याचे समोर आले.

पोलीस तपासात संशयित मनजीत कुमार गौतम (३५) याला अंधेरीतील एका कपड्यांच्या कारखान्यातून ताब्यात घेतले. सध्या त्याची चौकशी सुरू असून, त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गेल्या वर्षीपासून देशभरात अशा धमक्यांचे सत्र सुरू असून, बहुतांश धमक्या खोट्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी बहुस्तरीय मूल्यांकन आणि माहितीच्या स्रोतांच्या विश्वासार्हतेवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगींचा काँग्रेस पक्षात प्रवेश
Next Article ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली – अमित शाह

Latest News

ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका
देश - विदेश June 23, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत
महाराष्ट्र June 23, 2025
सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत
Top News June 23, 2025
विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?