Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बॉर्डर सिलिंगमध्येच घुसला मालट्रक; पोलिसांसह इतरांनी उडी मारुन वाचवला जीव; झाला असता मोठा अनर्थ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरगुन्हेगारी

बॉर्डर सिलिंगमध्येच घुसला मालट्रक; पोलिसांसह इतरांनी उडी मारुन वाचवला जीव; झाला असता मोठा अनर्थ

Surajya Digital
Last updated: 2020/08/12 at 2:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सिमेंट घेऊन वाहतूक करणा-या मालट्रक चालकाला पहाटे चांगलीच झोपेची डुलकी लागली. अशात सोलापुरात प्रवेश करीत असताना झोप न आवरल्याने पुढे ट्रक कोरोनामुळे बॉर्डर सिलिंग गेलेल्या पोलिसाच्या नाकाबंदीतच घुसला. मात्र प्रसंगावधान साधल्याने पोलिसांसह इतरजणांनी बाजूला उडी ठोकली. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हा प्रकार काल मंगळवारी नवीन हैदराबाद नाका येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.  मालट्रक काही अंतरावर असलेल्या लोखंडी बॅरिकेड्सला धडकून खुर्चीवर बसलेल्या पोलिसांच्या दिशाने आला. पोलिसांनी रस्त्यावरून उड्या मारत मंडपाच्या दिशेने धाव घेतल्याने त्यांचा जीव वाचला. चालक अवधूत लक्ष्मण बंडगर (वय 40 रा. सोलापूर) यास लागलीच पोलिसांनी धावून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालकाकडे चौकशी केली असता त्याने अचानक झोप लागली होती, असे सांगितले.  हा प्रकार अत्यंत भीतीदायक होता, कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी व अन्य कोविड वॉरियर्स घाबरले होते. सुदैवाने काही झालं नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी सांगितले.

नवीन हैदराबाद नाका येथे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे एक फौजदार, सहा पोलीस कर्मचारी, तालुका पोलिस स्टेशनचे दोन पोलिस कर्मचारी, चार होमगार्ड, एक शिक्षक व एक परिवहन विभागाचे कर्मचारी असे एकूण पंधराजण हा अपघात होण्यापासून सुदैवाने बचावले आहेत.

हैदराबाद रोडच्या दिशेने येणा-या मालट्रकचा अचानक मोठा प्रकाश पडला.  मालट्रक मंडपाच्या बांबूला धडकत सरळ निघून गेली, पुढे असलेल्या दुस-या लोखंडी बॅरिकेटला धडकली. एवढ्यावरही मालट्रक थांबली नाही ती वेगाने पुढे जात होती, मात्र लोखंडी बॅरिकेट्सना खाली अडकल्यामुळे ट्रकचालकास जाग आली आणि त्याने लागलीच ट्रक थांबवला. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी लागलीच मालट्रकच्या पाठीमागे धावून चालकाला ताब्यात घेतले.

मालट्रक मंडपामध्ये घुसला असता तर मोठा अनर्थ झाला असता चालक अवधूत बंडगर हा सिमेंटचा माल घेऊन सोलापूरला येत होता. १४ चाकी टायर असलेला हा मोठा मालट्रक जर रस्त्याच्या कडेला असलेला लहान सिमेंटचा गार्डन सोडून मंडपामध्ये असला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मालट्रक मंडपाच्या बांबूला घासत पुढे गेला त्यामध्ये मंडपावर लावण्यात आलेले लाईटचे व दोन्ही लोखंडी बॅरिकेड्सचे नुकसान झाले.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #सोलापूर #बॉर्डरसिलिंग #मालट्रकघुसला #अनर्थटळला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चालत्या बसला अचानक आग; पाचजणांचा मृत्यू तर २७ प्रवासी जखमी
Next Article दो करोड की शायरी,दो कौडी का घुटना!

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?