Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जागतिक महिला दिन विशेष : विद्यापीठात पाच वर्षात 2695 मुले तर 2879 मुलींनी घेतले शिक्षण!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

जागतिक महिला दिन विशेष : विद्यापीठात पाच वर्षात 2695 मुले तर 2879 मुलींनी घेतले शिक्षण!

Surajya Digital
Last updated: 2022/03/08 at 7:39 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ उच्च शिक्षण घेण्यामध्ये मुलांपेक्षा मुली आघाडीवर

सोलापूर – भारतामध्ये कधी काळी महिलांना दुय्यम स्थान तर होतेच, शिवाय शिक्षणाचे धडेही त्यांना दिले जात नव्हते. कालांतराने यात बदल होत गेला, पुढे क्रांतीज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली. आज शिक्षणाच्या जोरावर मुली व महिला सर्वच क्षेत्रात मोलाची भूमिका बजावताना दिसून येतात. उच्च शिक्षण क्षेत्रामध्येही महिला अव्वल स्थानी आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये मागील पाच वर्षांत पदव्युत्तर विभागाचे उच्च शिक्षण घेण्यात मुलींची संख्या अधिक आहे.

मागील पाच वर्षांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मुलांपेक्षा मुलींनी अधिक प्रमाणात प्रवेश घेतलेला आहे. यामध्ये शैक्षणिक वर्ष 2016-17 ते 2020-21 या पाच वर्षाच्या कार्यकाळातमध्ये एकूण 2695 मुले तर 2879 मुलींनी यशस्वी पद्धतीने उच्चशिक्षण घेतलेले आहे. 184 संख्येने मुलींची संख्या अधिक आहे. आज संपूर्ण जगात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनाच्या पूर्वसंध्येला उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांच्या सन्मानार्थ ही एक चांगली माहिती समोर आली आहे.

‘चूल आणि मूल’ या प्रथेमध्ये कधीकाळी अडकलेल्या मुली व महिला आज मोठ्या हिमतीने मुलांच्या पुढे जाऊन उच्च शिक्षण घेत आपला झेंडा मोठ्या गौरवाने फडकविताना दिसून येत आहेत. यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये एक महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळत बलशाली भारतासाठी योगदान देण्याचे कार्य आज महिला करीत आहेत. International Women’s Day Special: 2695 boys and 2879 girls were educated in the university in five years!

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कॅम्पसमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये 445 मुले तर 414 मुली, 2017-18 मध्ये 373 मुले तर 410 मुली, 2018-19 मध्ये 388 मुले तर 456 मुली, 2019-20 मध्ये 624 मुले तर 691 मुली आणि 2020-21 मध्ये 865 मुले तर 908 मुलींनी शिक्षण घेतलेले आहे. मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसून येते. यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, कम्प्युटर सायन्स, अर्थ सायन्समधील विविध विषयांचे शिक्षण घेण्यास मुलींनी अधिक पसंती दिलेली दिसून येते.

2004 ला सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाची चांगली सोय सोलापुरात झाली. आज त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनाच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. कॅम्पसमध्ये सुरवातीला पाच संकुले व आता अकरा संकुले सुरू झाल्याने विविध अभ्यासक्रमांची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. यामध्ये मुलींची संख्या तुलनेने अधिक आहे. सोलापूर जिल्हाबरोबरच उस्मानाबाद, सांगली, सातारा जिल्ह्यातील मुलींनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कॅम्पसमध्ये आज शिक्षण घेत आहेत.

● शिक्षणाच्‍या जोरावरच प्रगती

आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही आनंददायी बाब आहे. शिक्षणाच्या जोरावर महिला प्रगती करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच आज अंगणवाडी शिक्षिकेपासून ते पायलट आणि देशाच्या अर्थमंत्र्यापर्यंतची जबाबदारी समर्थ आणि सक्षमपणे महिला सांभाळत आहेत. महिलांना अधिक प्रमाणात उच्चपदांवर  येण्याची गरज आहे.

सर्व क्षेत्रात महिलांना करिअरसाठी वाव आहे. आज पुरुषांच्याबरोबरीने तसेच त्यांच्याहीपेक्षा चांगल्याप्रकारे महिला काम करत आहेत. प्राथमिक ते उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांची कामगिरी ही अभिमानास्पद असेच आहे. इंजिनिअरिंग, संशोधन क्षेत्रातही महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. महिला या धाडसी असतात.

व्यवस्थापनाचे धडे त्यांना कुटुंबातूनच मिळतात. त्यामुळे त्यांच्याकडे व्यवस्थापन कौशल्य चांगले असते. महिलांनी उराशी स्वप्न व ध्येय बाळगून त्यासंदर्भात शिक्षण घेत प्रगती साधावी, अशी प्रतिक्रिया जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #International #Women'sDay #Special #boys #girls #educated #university #fiveyears!, #जागतिक #महिलादिन #विशेष #विद्यापीठ #पाचवर्ष #मुले #मुली #शिक्षण!
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतीय राजदूत मुकूल आर्यांचा मृत्यू; घातपाताचा संशय
Next Article जागतिक महिला दिनी उद्यान एक्सप्रेस महिलांच्या हाती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?