Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजातर्फे भव्य मिरवणूक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजातर्फे भव्य मिरवणूक

Surajya Digital
Last updated: 2023/04/22 at 10:32 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

○ चार हुतात्मा चौकात मूर्तीची प्रतिष्ठापना; शेकडो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

 

सोलापूर :– भगवान परशुराम जयंती निमित्ताने आज शनिवारी (दिनांक २२ एप्रिल) भगवान परशुराम जयंती महोत्सव समितीतर्फे भगवान परशुराम यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. A grand procession by the Brahmin community on the occasion of Lord Parashuram Jayanti, Solapur

राजवाडे चौकातून सुरू झालेली ही मिरवणूक चार हुतात्मा चौकात समाप्त झाली. त्या ठिकाणी भगवान परशुरामाच्या साडेचार फूट मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर त्या ठिकाणी शेकडो भाविकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांचे दर्शनासाठी गर्दी झाली होती.

 

भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजातर्फे स्थापन करण्यात आलेल्या परशुराम जयंती महोत्सव समितीतर्फे शनिवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक नव्या पेठेतील राजवाडे चौकातून दुपारी चार वाजता भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर निघाली. राजवाडे चौकातून निघालेली ही मिरवणूक नवी पेठ, मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक मार्गे जाऊन चार हुतात्मा पुतळा चौकात समाप्त झाली.

 

या मिरवणुकीत घोडेस्वार, लेझीम पथक ढोल पथक, यांच्यासह समाजातील महिला -पुरुष, युवक – युवती आदींनी पारंपारिक वेष परिधान करून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला होता. भगवान परशुराम जयंतीनिमित्त निघालेली ही मिरवणूक चार हुतात्मा चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मरुंदांच्या मंत्रघोषात भगवान परशुरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

 

वेदमूर्ती गोविंद गवई, मुकुंदराव मुळेगावकर, ऋषिकेश दादेगावकर आदी ब्रह्मवृदांनी मंत्र पठण केले. त्यानंतर त्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी आणि प्रसादासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी भगवान परशुराम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजन कामत, निमंत्रक नितीन कुलकर्णी, कार्याध्यक्ष अमर कुलकर्णी, सुधीर कुलकर्णी, मोहिनी पतकी, महिला प्रतिनिधी आश्लेषां नीपुणगे, प्रसिद्धी प्रमुख दत्ता आराध्ये, राम तडवळकर, पंचांगकर्ते मोहनराव दाते, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नरेंद्र काळे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, चंद्रकांत वानकर, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी, माजी नगरसेवक विनोद भोसले, पांडुरंग दिड्डी, प्रशांत इंगळे, नाट्य परिषदेचे विजय साळुंखे

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

व्यंकटेश पटवारी,  पत्रकार अभय दिवाणजी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे सतीश पाटील, श्याम जोशी, हेमा चिंचोळकर, विजय कुलकर्णी, यांच्यासह जयतीर्थ पडगानूर, विक्रम ढोनसळे, गोपाल खंडेलवाल, प्रशांत बडवे, अॅड. यशश्री मराठे, मोहिनी पतकी, प्रशांत कुलकर्णी, मीनाताई चाटी, नीरज गोडबोले, ब्रह्म प्रतिष्ठानचे सुहास देशपांडे, यांच्यासह समाजबांधव, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

● भगवान परशुराम जयंतीनिमित्त प्रथमच सोलापुरातून ब्राह्मण समाजातर्फे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे मिरवणुकीत अभूतपूर्व असा उत्साह दिसून आला.

● भगवान परशुरामांच्या मूर्ती स्थापनेनंतर सायंकाळी विविध समाजातील मान्यवरांनी हुतात्मा चौकात भेट देऊन दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #grand #procession #Brahmin #community #occasion #LordParashuram #Jayanti #Solapur, #सोलापूर #भगवान #परशुरामजयंती #ब्राह्मण #समाज #भव्य #मिरवणूक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धर्मादाय उपायुक्तांनी बाळे खंडोबा देवस्थानाच्या चेअरमन सचिवाचे अधिकार गोठवले
Next Article राजकारणाचे उद्योग; उद्योगाचे राजकारण

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?