Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ब्रेकिंग – म्हाडाच्या आजपासूनच्या सर्व परीक्षा रद्द, पुढच्या वर्षी होणार परीक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

ब्रेकिंग – म्हाडाच्या आजपासूनच्या सर्व परीक्षा रद्द, पुढच्या वर्षी होणार परीक्षा

Surajya Digital
Last updated: 2021/12/12 at 5:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतानाच आता म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आज (रविवार) होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आरोग्य विभागाची परीक्षाप्रमाणेच ही परीक्षा रद्द केल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेतल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. आज परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो, असेही ते म्हणाले.

ज्या कंपनीला पेपरचं काम देण्यात आलं त्याच्या मालकाच्या लॅपटॉपमध्ये काही प्रश्नपत्रिका आढळल्या. पोलिसांनी कारवाई केली आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच यानंतर म्हाडाच्या जेवढ्या परीक्षा होतील, त्या म्हाडा घेईल. परीक्षेसाठी घेण्यात आलेली फी म्हाडा परत करेल शिवाय पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी फी घेणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आजपासून सुरू होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. काल शनिवारी रात्री उशिरा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यात त्यांनी सांगितलं की म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आज ही परीक्षा होणार नाही. काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा थेट जानेवारी 2022 मध्ये घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाड यांनी यासाठी विद्यार्थ्यांची माफीही मागितली आहे. आज होणारी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जावू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासासाठी माफी मागत विद्यार्थ्यांनी सकाळी केंद्रावर जाण्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नये, यासाठी आपण एवढ्या रात्री हा व्हिडिओ शेअर करत असल्याचंही आव्हाडांनी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे. दरम्यान म्हाडाची परीक्षा आता जानेवारी महिन्यात घेतली जाणार आहे.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #Breaking #MHADA #exams #canceled #today #held #nextyear, #ब्रेकिंग #म्हाडाच्या #सर्व #परीक्षा #रद्द #पुढच्या #वर्षी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बैलगाडी उलटल्याने शेतकरी जखमी; वैरागवाडीत ७ जणांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा
Next Article बार्शी – कुर्डूवाडी रोडवर पहाटे भीषण अपघात, 2 ठार 10 जखमी

Latest News

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी
देश - विदेश July 1, 2025
राजदंड उचलण्याचा प्रयत्न, नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
Top News July 1, 2025
ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन
देश - विदेश July 1, 2025
पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
Top News July 1, 2025
राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी
देश - विदेश July 1, 2025
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान
Top News July 1, 2025
इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?