Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातून 4 माजी नगरसेवकांसह 500 कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

सोलापुरातून 4 माजी नगरसेवकांसह 500 कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल

Surajya Digital
Last updated: 2023/07/09 at 5:10 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोलापुरात भाजपला मोठा धक्का दिला आहे. सोलापुरात भाजपचा राजीनामा दिलेल्या 4 माजी नगरसेवकांनी व एका बड्या शिक्षण संस्थेच्या सचिवासह पाचशे कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.  500 activists join BRS including 4 former corporators from Solapur Nagesh Valyal Hyderabad BJP सोलापुरातून या सर्व कार्यकर्त्यांनी शंभरहून अधिक वाहने घेऊन हैदराबाद गाठले होते. या सर्वांचा मुख्यमंत्री के.सी. आर. यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश सोहळा पार पडला.

 

हैदराबाद येथील भारत राष्ट्र समितीच्या मुख्यालयात पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप,भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्यासह संतोष भोसले,जुगून अंबेवाले आणि राजश्री चव्हाण या भाजपच्या माजी नगरसेवकांनी बीआरएसचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी केसीआर यांनी सोलापूर शहराचा विकास करु, असे आश्वासन दिले. यावेळी केसीआर यांनी आपण लवकरच सोलापुरात येणार असे जाहीर केले. “लाखोंच्या उपस्थितीत जुलै अखेर सोलापूरात भव्य सभा घेऊ, तेव्हा लोकांनी सोलापूरच्या विकासासाठी बीआरएसच्या प्रभावी पर्यायाचा विचार करावा,” असेही ते म्हणाले.

केसीआर म्हणाले, “सोलापूर सारखे मोठे शहर विकासापासून वंचित आहे, येथे शिकलेल्या मुलांना रोजगारासाठी परगावी जावे लागते. हे विदारक चित्र दूर करण्यासाठी बीआरएसच्या हाती सत्ता द्या. आम्ही शहराचा विकास तर करूच शिवाय मोठे मोठे आयटी कंपन्याही आणू, शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

https://twitter.com/BRSparty/status/1677681969449107456?t=sR9bMpi0MnCVa059dw8YRQ&s=19

 

लोकांना पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपला जनतेने संधी दिली, तरीदेखील या राज्याचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. अशीच परिस्थिती देशाच्या अन्य राज्यांची आहे. तेव्हा भारतात क्रांती,परिवर्तनाची गरज आहे,परिवर्तित भारतच समस्यांचे उच्चाटन करू शकतो. बीआरएस हा क्रांती आणणारा पक्ष आहे. बीआरएस पक्षाचा देशभरात विस्तार करून शेतकऱ्यांची सत्ता देशावर आणण्याचा आमचा संकल्प आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही देशाचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याची खंत केसीआर यांनी व्यक्‍त केली.

भाजपचे दिवंगत नेते, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र, माजी नगरसेवक नागेश वल्याळ म्हणाले, “सोलापूरचा आजवर सत्ताधाऱ्यांनी विकास केला नाही. त्यामुळे आता तेलंगणा पॅटर्नची सोलापूरला नितांत गरज आहे. सोलापूरचा विकास करण्याच्या उद्देशाने मी व दशरथ गोप यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. उच्च शिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, बंगळुरु, हैदराबादला जातात. त्यांच्यासाठी सोलापुरात आयटी कंपनी आणणे बीआरएसकडून अपेक्षित आहे,”

नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि जुगनबाई आंबेवाले या चार माजी नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ठरल्याप्रमाणे बीआरएस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय शंभर वर्षे जुन्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनीही बीआरएसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे सर्वजण पाचशे कार्यकर्त्यांसह हैदराबादकडे रवाना झाले. सायंकाळी ज्युबिली हिल्स भागातील बीआरएस भवनात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, अर्थंमत्री हरीश राव आदींनी वल्याळ व इतरांना पक्षात प्रवेश देऊन स्वागत केले.

सोलापूर शहरातील प्रामुख्याने तेलुगु भाषकांचा पट्टा असलेल्या पूर्वभागाकडे बीआरएस पक्षाने अधिक लक्ष देऊन तेथे बस्तान बसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. याच पूर्व भागात राहणारे काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी सर्वप्रथम बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. भाजपचे दहा माजी नगरसेवक बीआरएस पक्षात येण्यास इच्छूक असल्याचा दावा सादूल यांनी केला होता.

 

गेल्या महिन्यातील २७ जून रोजी आषाढी वारीचे निमित्त पुढे करून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह बीआरएस पक्षाचे सर्व आमदार, खासदार व पदाधिका-यांना सोबत घेऊन सोलापूर आणि पंढरपूरला आले होते. पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भगीरथ भालके यांनी आपल्या सरकोली गावात चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत जंगी शेतकरी मेळावा भरवून बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळी सहाशे मोटारींचा मोठा ताफा घेऊन चंद्रशेखर राव यांनी केलेला सोलापूर व पंढरपूर दौरा राज्यात चर्चेचा विषय झाला होता.

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

संजय गायकवाडांना समज देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

TAGGED: #500 #activists #join #BRS #former #corporators #Solapur #NageshValyal #Hyderabad #BJP #kcr, #सोलापूर #4 #माजीनगरसेवक #500 #कार्यकर्ते #बीआरएस #दाखल #केसीआर #वल्याळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article झोन अधिकारी नाईकवाडी यांच्यासह चौघे निलंबित
Next Article हैद्राबाद रोडवर एसटीच्या धडकेने दुचाकीवरील महिलेसह दोघे जखमी

Latest News

कपिल शर्माच्या हॉटेलवरील हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
देश - विदेश July 11, 2025
अमेरिकेकडून लेखी हमी मिळेपर्यंत अणु चर्चा नाही -इराण
देश - विदेश July 11, 2025
गुजरात पूल दुर्घटना : मृतांचा आकडा १७ वर तर ३ जणांचा शोध अजूनही सुरू, ४ अधिकारी निलंबित
देश - विदेश July 11, 2025
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?