Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कर्तव्यादरम्यान झालेल्या वादानंतर बीएसएफ जवानाकडून सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कर्तव्यादरम्यान झालेल्या वादानंतर बीएसएफ जवानाकडून सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या

admin
Last updated: 2025/06/15 at 3:23 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता , 15 जून (हिं.स.)। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचारग्रस्त भागात कर्तव्यावर असताना एका बीएसएफ जवानाची दुसऱ्या बीएसएफ जवानाने गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्तव्यादरम्यान दोघांमध्ये झालेल्या वादानंतर बीएसएफ जवानावर त्याच्याच सहकाऱ्याने एकूण १३ गोळ्या झाडल्या असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रतन लाल सिंग (३८) असे मृत जवानाचे नाव आहे. राजस्थानचा रहिवासी असलेला आरोपी बीएसएफ जवान एस.के. मिश्रा याला मुर्शिदाबादच्या शमशेरगंज पोलिसांनी अटक केली. ही घटना धुलियान नगरपालिकेत शनिवारी (दि. १४) रात्री १०:३० च्या सुमारास घडली. राजस्थानमधील आणि बीएसएफच्या ११९ व्या बटालियनमध्ये तैनात असलेले आरोपी एसके मिश्रा याने जोरदार वादानंतर त्यांच्या इन्सास रायफलमधून १३ गोळ्या झाडल्या. त्यापैकी किमान पाच गोळ्या रतन लाल सिंग यांना लागल्या त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुर्शिदाबादच्या सर्व हिंसाचारग्रस्त भागात बीएसएफ तैनात करण्यात आले होते. दोन्ही सैनिक सीमा सुरक्षा दलाच्या ११९ व्या बटालियनमध्ये तैनात होते. शनिवारी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका सैनिकाने दुसऱ्यावर गोळीबार केला. जखमी बीएसएफ जवानाला आधी अनुपनगर रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती अधिक खालवल्याने जांगीपूर उपविभागीय रुग्णालयात हलवण्यात आले. जांगीपूर उपविभागीय रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी बीएसएफ जवानाला मृत घोषित केले.

गोळीबारानंतर एसके मिश्रा सापडला नाही. मात्र नंतर शमशेरगंज पोलिसांनी मिश्राला बंदुकीसह पोलीस ठाण्यात आणले आणि त्याला अटक केली. बीएसएफ अधिकाऱ्यांनीही मिश्रा पोलिसांना सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार – प्रताप सरनाईक
Next Article बच्चू कडू यांनी उपोषणाच्या रूपानं उतारा शोधला की काय अशी चर्चा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?