Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कार्यालय सील केल्याने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची महापालिकेत धाव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कार्यालय सील केल्याने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची महापालिकेत धाव

Surajya Digital
Last updated: 2023/03/29 at 9:29 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
○ कर आकारणीवर अधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप !स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालयाला ठोकले सील !

○ कर आकारणीवर अधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप !

 

सोलापूर : होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालय मिळकतकर थकबाकीपोटी महापालिकेने सील केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बुधवारी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेत धाव घेतली. अधिकाऱ्यांची भेट घेत कर आकारणीवर आक्षेप घेतला. मात्र शास्तीसह संपूर्ण कर भरावाच लागेल, अशी ठाम भूमिका महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी घेतली आहे.

 

सोलापूर महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून काल मंगळवारी होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालय 75 लाख 67 हजार 553 रुपयाच्या मिळकत कर थकबाकीपोटी सील करण्यात आले तसेच येथील पाण्याचे 2 नळही बंद करण्याची बेधडक कारवाई केली. त्यानंतर बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी थेट महापालिकेत धाव घेतली. मिळकत कराची आकारणी अधिक केल्याचा आक्षेप घेतला. कराची रक्कम अधिक आहे असे सांगितले. अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले तसेच महापालिकेकडे बीएसएनएलचे सुमारे साडेतीन लाख रुपये बिल थकीत आहे तेही त्यांनी भरावे , असे स्पष्ट केले.

 

दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांना विचारले असता कोणत्याही स्थितीत शास्तीसह संपूर्ण कर बीएसएनएल कार्यालयाला भरावा लागेल. कोणतेही सूट मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अगोदर नोटीस दिल्याप्रमाणे बीएसएनएलने आपली कर थकबाकी भरावी. साहजिकच महापालिका बीएसएनएलचे बिल भरणारच आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालयाला ठोकले सील !

 

○ एकाच दिवशी 1 कोटी 26 लाख रुपये मिळकत कर वसूल !

 

सोलापूर : महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून मंगळवारी होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालय मिळकत कर थकबाकीपोटी सील करण्यात आले तसेच येथील पाण्याचे 2 नळही बंद करण्यात आले आहेत. तर 58 पेठ येथील 5 गाळे सील करण्यात आले आहेत. आज दिवसभरात एकूण 1 कोटी 26 लाख 3 हजार 309 रुपये कर वसुली करण्यात आली आहे.

 

सोलापूर महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकाद्वारे मिळकत कर वसुली व जप्ती – सिलची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज मंगळवारी महापालिकेच्या पथकांकडून बेधडक कारवाई करण्यात आली.

 

 

होटगी रोडवरील बीएसएनएलचे सहाय्यक अभियंता टेलिको सब डिव्हिजन हे कार्यालय 75 लाख 67 हजार 553 रुपयाच्या थकबाकीपोटी सील करण्यात आले तसेच येथील दोन व एक इंची पाण्याचे नळही बंद करण्यात आले. 58 पेठ येथील इमाम रमजान नदाफ यांच्याकडील 6 लाख 4 हजार 470 रुपये थकबाकी पोटी पाच गाळे सील करण्यात आले आहेत.

 

दरम्यान, मालमत्ता कर विभाग मुख्य कार्यालय पथकाकडून सोलापूर शहरातील 61 पेठ, सिव्हील लाईन, 58 पेठ येथील सात मिळकतदारांकडे एकूण 5 लाख 95 हजार 119 रुपये असलेल्या थकबाकी पैकी 5 लाख 39 हजार 559 रुपये कर वसूल करण्यात आला आहे.

 

महापालिकेकडून करण्यात येत असलेली जप्ती – सिलची कारवाई टाळण्यासाठी मिळकतदारांनी आपला कर त्वरित भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मालमत्ता कर विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #After #sealing #office #BSNL #officials #run #Municipal #Corporation #object #Solapur #tax #levy, #कार्यालय #सील #बीएसएनएल #अधिकारी #सोलापूर #महापालिका #धाव #करआकारणी #आक्षेप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । व्यापाऱ्याजवळ पाहिली रोकड, गळा दाबून पॅन्टच्या खिशातून रोकड चोरली
Next Article Sugar factory हंगाम संपला; एफआरपी लांबला, बळीराजा खंगला

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?