Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: #budget : 15 वर्षाच्या जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ केली जाहीर, इंधन अधिभार वाढणार तर आरोग्य क्षेत्राला झुकते माप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

#budget : 15 वर्षाच्या जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ केली जाहीर, इंधन अधिभार वाढणार तर आरोग्य क्षेत्राला झुकते माप

Surajya Digital
Last updated: 2021/02/01 at 2:23 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे कोविडमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व स्थितीवर मात करण्यासाठी गेल्या 10 महिन्यात घोषित आणि लागू केलेल्या विविध वित्तीय कार्यक्रमांचाच एक भाग राहील अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ जाहीर केली आहे. 20 वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची 15 वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

* इंधन अधिभार वाढणार

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवण्याचा निर्णय घेतलाय. पेट्रोलवर 2.5 रुपयांचा, तर डिझेलवर 4 रुपयांचा कृषी अधिभार लावण्याची घोषणा सरकारनं केलीय. त्यामुळं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे अगोदरच 93 रुपयांवर गेलेलं पेट्रोल आता शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवण्याचा निर्णय घेतलाय. पेट्रोलवर 2.5 रुपयांचा, तर डिझेलवर 4 रुपयांचा कृषी अधिभार लावण्याची घोषणा सरकारनं केलीय. मात्र त्याचवेळी पेट्रोल डिझेलवरील बेसिक एक्साईज आणि स्पेशल एक्साईज कमी करण्यात आल्यामुळं ग्राहकांना फरक पडणार नसल्याचं सांगण्यात येतंय.

* आरोग्य क्षेत्राला झुकते माप

आरोग्य क्षेत्राला अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार झुकते माप देताना दिसत असून आजार रोखणं हे सरकारसमोरचं सर्वात मोठं लक्ष्य आहे असे निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना सांगितले आहे.

देशात 15 आरोग्य आपत्कालीन केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. सरकारने कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प संकटातील संधीप्रमाणे आहे असे देखील त्या म्हणाल्या.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सर्वसामान्यांची निराशा, कर संरचनेत कोणतेही बदल नाही, टॅक्स स्लॅब ‘जैसे थे’, सविस्तर वाचा
Next Article आयडीबीआय आणि एलआयसीच्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब, वीज क्षेत्रासाठी मोठी घोषणा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?