लखनऊ, २५ ऑगस्ट: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात ८ लोकांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला एका कंटेनरने धडक मारल्यामुळे हा अपघात झाला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी जिल्हा प्रशासनाला जखमी लोकांना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. गोगाजीच्या दर्शनासाठी कासगंजहून राजस्थानला जाणाऱ्या या भाविकांपैकी १० गंभीर जखमींना अलीगढ उच्च केंद्रात पाठवण्यात आले आहे.
जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.