Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फोर्ब्सच्या मासिकात झळकला बुलडाण्यातील शेतकऱ्याचा मुलगा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

फोर्ब्सच्या मासिकात झळकला बुलडाण्यातील शेतकऱ्याचा मुलगा

Surajya Digital
Last updated: 2022/02/09 at 4:04 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

बुलढाणा : फोर्ब्स मॅगझिनने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या यादीत बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातल्या राजू केंद्रेचे नाव आले आहे. राजू सध्या लंडनमध्ये चेवनिंग स्कॉलरशिप वर SOAS युनिव्हर्सिटीस ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकतोय. फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या यादीत फोर्ब्स ३० अंडर ३० मध्ये त्याचा समावेश आहे. त्यामुळे या शेतकरी पुत्राचे बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरात कौतुक होत आहे.

जगभरात विविध विषयांमध्ये चांगली आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांच्या कामाची दखल फोर्ब्स मासिकात घेतली जाते. आपली वेगळी वाट शोधून काहीतरी वेगळं करणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते की आपलं नाव हे एकदातरी फोर्ब्सच्या मासिकात यावं. राजू केंद्रे हा ‘एकलव्य इंडिया’ याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करतो. स्वत: सारख्या पहिल्या पिढीतील शिकणाऱ्यांना तळागाळातील विद्यार्थ्यांचं नेतृत्व सक्षम करण्याचं काम तो करतो. तो सध्या चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकत आहे. याठिकाणी तो ‘भारतातील उच्च शिक्षण आणि असमानता’ या विषयावर संशोधन करत आहे.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल फोर्ब्स मासिकानं बुलढाण्यातील राजू केंद्रेची दखल घेतली असून २०२२ च्या ‘Forbes 30 Under 30’ यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राजूने केलेल्या कामगिरीबाबत एक स्टोरी प्रकाशित केली आहे. ‘फोर्ब्स’ इंडिया फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर यादी आणि त्याची स्टोरी पब्लिश झाली आहे. ही यादी आता ऑनलाईनही उपलब्ध होणार आहे.

राजू विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री-खंदारे या छोट्याश्या खेड्यातील भटक्या समाजाचा विद्यार्थी आहे. राजुच्या आई वडिलांचे प्राथमिक शिक्षणही झालेलं नाही.

The son of a bulldozer farmer who appeared in Forbes magazine

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

राजूच्या माध्यमातून केंद्रे कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. राजूने शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पुढे कलेक्टर व्हावं म्हणून पदवीच्या शिक्षणासाठी तो पुण्याला गेला, परंतू कुणी मार्गदर्शक नसल्याने खूप चकरा मारूनही हॉस्टेल राजूला मिळालं नाही. ज्यामुळे त्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला नाही. यानंतर राजूने BPO मध्ये काम करायचा प्रयत्न केला पण तिथेही वैदर्भीय भाषेचा टिकाव लागला नाही. अवघ्या काही महिन्यात राजूने पुणे सोडले.

आजही क्षमता असतानाही अशा प्रकारची व्यवस्था व परिस्थितीसमोर मुकणारी अशी भरपूर विद्यार्थी आपल्या आजूबाजूला तांड्यात, झोपडपट्टीत, वाड्यात, पाड्यात आपल्याला दिसत असतात. म्हणूनच त्यावर काम करण्यासाठी अवघ्या विशीतल्या राजूने संघर्षाचं प्रतीक असणारं ‘एकलव्य’ नावाचं एक व्यासपीठ तयार केलं. पुढच्या पिढीच्या उच्चशिक्षण मार्गातील अडचणी कमी व्हाव्यात आणि जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं हा त्यापाठीमागचा उद्देश होता.

२०१२ ला मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजुला मेळघाट या आदिवासी भागात जाण्याची संधी मिळाली. मेळघाटात मित्रच्या गटासोबत दोन वर्ष पूर्णवेळ काम त्याने केले. राजू कलेक्टर होऊन भविष्यात सामाजिक बदल घडवून आणण्याचे स्वप्न पाहत असताना तो आदिवासी भागातील त्यावेळेसचे प्रश्न आणि अडचणी पाहून अस्वस्थ व्हायचा. त्यामुळे शेवटी आजचे प्रश्न समजून घेऊन आधी त्यावर उत्तर शोधायचं राजूने ठरवलं आणि अधिकारी होण्याचं स्वप्न सोडून दिलं.

टाटा इनस्टिट्युटमधून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेताना त्याने ग्रामपरिवर्तन चळवळीद्वारे स्वतःच्या गावातच काम करायचे ठरवले. त्याद्वारे त्याला थेअरीचे ज्ञान प्रत्यक्षात आणायचं होते. २०१५ मध्ये त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवायचे ठरवले. आपल्या गावाचा जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर बनवला आणि तो गावकऱ्यांना दिला. परंतू प्रस्थापित राजकीय समाजाने त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. बरेच अडथळे होते पण त्यातूनही तो शिकत होता. राजूने महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण विकास फेलोशिप मध्येही म्हणून काम केलं. त्या काळात त्याने पारधी समाजासाठी विकासकामे केली. त्याच्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली.

 

 

You Might Also Like

इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार – मुख्यमंत्री

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

TAGGED: #RajuKendra #farmer's #son #Buldana #featured #Forbes #Magazine, #फोर्ब्स #मासिक #झळकला #बुलढाणा #शेतकरी #मुलगा #राजूकेंद्रे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्नाटकात वाद पेटला, शाळा – कॉलेज 3 दिवस बंद; प्रियंका गांधींचीही वादात उडी
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?