Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरनंतर बुलढाण्यात भाविकांवर काळाचा घाला; पाच ठार, चार जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

सोलापूरनंतर बुलढाण्यात भाविकांवर काळाचा घाला; पाच ठार, चार जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/03/14 at 10:09 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

□ महाराष्ट्र हादरला, 9 ठार

बुलडाणा : सोलापूरपाठोपाठ बुलडाण्याच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला आहे. बुलडाण्याच्या देऊळगाव राजा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 4 भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

मृतक आणि जखमी जालना जिल्ह्यातील रोहणवाडी आणि कारखेडा गावचे रहिवासी आहेत. गंभीर जखमींमध्ये आम्रपाली विठ्ठल पाडमुख (वय 35), मिनाबाई श्रीमंत पाडमुख (य 35), अशोक गरिबदास लिहनार (वय 26), मीराबाई परमेश्वर बाळराज (वय 40), तुकाराम बाबुराव खांडेभराड (वय 40), बाबुराव श्रीपत कापसे (वय 50), परमेश्वर कचरूबा बाळराज (वय 45 सर्व रा.रोहनवाडी जि.जालना) यांचा समावेश आहे.

खामगाव जालना महामार्गावर बोलेरो आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली. यात शेगावला देवदर्शनासाठी जाणाऱ्या 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 भाविक गंभीर जखमी आहेत. जखमींवर देऊळगाव राजा आणि जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

● महाराष्ट्र हादरला, 9 ठार

एकापाठोपाठ झालेल्या भीषण अपघातांने पुरता महाराष्ट्र हादरून गेला आहे. सोलापूरमध्ये पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला ट्रकनं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. तर बुलढाण्याच्या देऊळगाव राजा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. सोलापुरात चार तर बुलढाण्यात पाच असे एकूण 9 भाविक ठार झाले होते. After Solapur, time is spent on devotees in Buldhana; Five killed, four injured

■ मगरपाटीजवळ अपघात, दुचाकी चालक ठार

सोलापूर – वेगाने जाणारी दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्याने तानाजी युवराज चव्हाण (वय २२ रा.पापरी ता.मोहोळ) हा गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी मयत झाला. हा अपघात मगरपाटीच्या  वळणावर रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

तानाजी चव्हाण हा काल रात्री पापरी येथून देगाव कडे दुचाकी वरून निघाला होता. मगरपाटीजवळ हा अपघात घडला. त्याला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पहाटे दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

■ विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

कल्लाप्पावाडी (ता.अक्कलकोट) येथे राहणाऱ्या दिपाली सिद्धाराम जानकर (वय २४) या विवाहितेने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. काल रविवारी सकाळी हा प्रकार घडला होता. तिला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून पतीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान ती सोमवारी सकाळी मरण पावली.

■ सतनाम चौकात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – शहरातील सतनाम चौका जवळ (लष्कर) राहणाऱ्या लक्ष्मण नारायण पानगंटी (वय३०) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल रविवारी रात्री १२ वाजण्याच्या पूर्वी घडली. त्याने घरातील छताच्या लोखंडी हुकाला चादरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता  त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला. या घटनेची नोंद सदर बझार पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार वाडीकर पुढील तपास करीत आहेत.

■ तोंडावर ऍसिड टाकण्याची धमकी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा

सोलापूर – एका अल्पवयीन तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करून ‘तू माझ्याशी नाही बोलली तर, तोंडावर ऍसिड टाकतो. तसेच तुझ्या आई-वडिलांना बघून घेतो. अशी धमकी दिल्याप्रकरणी सिद्धार्थ रेऊरे (रा.रविन्द्रनगर, गवळीवस्ती आकाशवाणी केंद्राजवळ) या तरुणाविरुद्ध एमआयडीसीच्या पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. सिद्धार्थ हा गेल्या दोन वर्षांपासून त्या मुलीचा पाठलाग करीत होता. शिवाय तिला न बोलल्यास धमकी दिली होती. अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली. सहाय्यक निरीक्षक पेटकर पुढील तपास करीत आहेत .

You Might Also Like

मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

वर्धा : गांधीवादी संस्थांमध्ये नक्षलवाद्यांची घुसखोरी

राज्यात वातावरणात अस्थिरता; पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

TAGGED: #Solapur #time #spent #devotees #Buldhana #Fivekilled #fourinjured, #सोलापूर #बुलढाणा #भाविक #काळाचा #घाला #पाचठार #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अपघातग्रस्त वारकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी, ट्रकचालकाला घेतले ताब्यात
Next Article कंटेनरला धडकून शेतकरी ठार, आरटीओची गाडी फोडून अधिका-यांना मारहाण

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?