Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बुरगुंडा हरपला…भारुडरत्न निरंजन भाकरे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
ब्लॉग

बुरगुंडा हरपला…भारुडरत्न निरंजन भाकरे

Surajya Digital
Last updated: 2021/04/24 at 2:40 PM
Surajya Digital
Share
7 Min Read
SHARE

भारुडरत्न निरंजन भाकरे आज गेले. वाईट हे आहे की भारुडाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करत असतानाच तोच कोरोना त्यांच्या मृत्यूचे कारण बनला. गेल्या काही वर्षांपासून भाकरेंनी देहदानाबद्दल भारुडाच्या माध्यमातून मोठी चळवळ सुरू केली होती. परंतू कोव्हिडमुळे त्यांची देहदानाची शेवटची इच्छाही पूर्ण होऊ शकली नाही. भाकरेंसोबत मी अनेक लोककलांचे कार्यक्रम केले होते, दौरे केले होते. त्यांच्या सादरीकरणाचे खास फोटोशुट मी त्यावेळी केले होते.
काही वर्षांपूर्वी आमचे मित्र आणि लोककला अकादमीचे संचालक Ganesh Chandanshive यांनी निरंजन भाकरे यांच्यावर दिव्य मराठी रसिक पुरवणीत लेख लिहिला होता. या भारुडकाराचे लोककलेच्या क्षेत्रात किती मोठे योगदान होते हे हा लेख वाचून लक्षात येईल…


—————-
“अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र,
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र
तया आठविता महापुण्यराशी
नमस्कार माझा, सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी,
संत एकनाथ महाराज की जय”

'भारूडरत्न' निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन https://t.co/vQSeDAEnJg

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021

‘बहुरूढ तेच भारूड’ असं भारुडाबद्दल म्हटलं जातं. भारूड म्हटलं की, आपणास संत एकनाथांची भारुडे आठवतात. परमेश्वर हा बहुरूपी आहे. त्याने जशी सोंगे घेतली तशीच सोंगे भक्त भारुडासारख्या भक्तिनाट्यात घेतात. अशा भारूडकारांची परंपरा आजच्या काळातही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निरंजन भाकरे या बहुआयामी भारूडकाराबद्दल जाणून घेऊ या.

भारुडाला देश-विदेशात ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ भारुडकार निरंजन भाकरे यांच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. भारुड या लोककलेचं जतन व संवर्धन करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न नेहमीच स्मरणात राहतील!
भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏 pic.twitter.com/sLYnWOQfl6

— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 24, 2021

निरंजन भाकरे यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद नावाच्या छोट्याशा गावात स्वतःचं घर नसलेल्या मुरलीधर शिंपी यांच्या घरी झाला. वडील शिवणकाम करीत. घरची परिस्थिती खूप हालाखीची. त्यातच त्यांच्या वडिलांची सात अपत्ये जन्मताच देवाघरी गेलेली. हातातोंडाची जेमतेम भेट होणाऱ्या या शिंपी कुटुंबात पुन्हा मुरलीधर अप्पांच्या पत्नीला म्हणजेच कस्तुराबाईंना दहाव्यांदा गर्भधारणा झाली. कस्तुराबाईंची तब्येत पाहता डॉक्टरांनी अप्पांना बाजूला बोलावून विचारलं “आपणास पत्नी हवी की पोटातलं बाळ?” अप्पा धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांनी निपट निरंजन महाराज समाधीला हात जोडून नवस केला. बाळंतपण सुखरूप झालं. बाळ अाणि आईही सुखरूप वाचली अणि १० जून १९६५ रोजी निपट निरंजन महाराज यांच्या नावावरून भारूडकार निरंजन भाकरेंचा जन्म झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारुड या लोककलेला देश-विदेशात ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ भारुडकार निरंजन भाकरे यांच्या निधनामुळे सामाजिक भान जपणारा गुणी लोककलावंत हरपला. भारुड आणि इतर लोककलांच्या जतन व संवर्धनासाठी त्यांचा कायम पुढाकार- सांस्कृतिक कार्य मंत्री @AmitV_Deshmukh यांनी व्यक्त केला शोक pic.twitter.com/CoKbyAGAPy

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 23, 2021

भाकरे अवघे सात वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना आजाराने घेरलं. महिन्याभरातच वडील त्यांना सोडून गेले. अशातच १९७२चा भीषण दुष्काळ मराठवाड्याने अनुभवला. परिस्थिती हालाखीची बनली. भाकरेंच्या आईपुढे अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला. पण फांदीच्या भाजीचा पाला आणि मिळेल तेव्हा जवसाच्या भाकरी खाऊन त्यांनी दिवस काढले. पतीचा वियोग आणि मुलांची चिंता यात त्यांची आई भ्रमिष्ट बनली. मुलं आईचा सांभाळ करू लागली. तशात दुष्काळी भागांत शासनाच्या वतीने नाला बडिंगची कामं सुरू झाली. भाकरे आणि त्यांची बहीण या कामाला जाऊ लागले. संध्याकाळी दमूनभागून घरी परतल्यावर आई गळ्यात पडून ढसाढसा रडत असे. दिवसांमागून दिवस सरत गेले. वेदनेने गाठलेल्या परिसीमेमुळेे ओठांतून गाणी उमटू लागली. भाकरे मजुरांसमोर वाटीवर ठेका धरत गाणी गाऊ लागले.

संत एकनाथ महाराजांच्या भारुडाला भाकरे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद गावाचे नाव त्यांनी जगभरात नेले. मराठी लोककला क्षेत्रातील तारा आज निखळला,भावपूर्ण श्रद्धांजली !

— Supriya Sule (@supriya_sule) April 23, 2021

खरे तर भाकरेंना वडिलांकडूनच भजनाची परंपरा लाभली. वडील झोळणीत घालून झोकां देत भजन, पोवाडे गात. यातूनच नकळत त्यांच्यावर कलेचे संस्कार होत गेले. शालेय शिक्षण झाल्यावर पुढे औरंगाबाद एमआयडीसीमध्ये लुपीन या औषधनिर्मिती कंपनीत १० रुपये हजेरीने कामाला लागले. लग्न झालं, आणि संसाराचा गाढा ओढत त्यांनी छोट्या-मोठ्या कलापथकांतून पेटीवादक म्हणून पैसा कमवण्यास सुरुवात केली. अशातच कलापथकाच्या दौऱ्यावर असताना ठाणे जिल्ह्यात एक चहाच्या टपरीवर ‘लोकसत्ता’ वाचताना अशोकजी परांजपे यांचं चरित्र त्यांच्या वाचनात आलं आणि जणू त्यांना आशेचा नवा किरण दिसू लागला.
भाकरेंनी अशोकजींची भेट घेण्यासाठी औरंगाबाद गाठले. अशोकजींनी विचारपूस करत ‘तुला लोककलेबद्दल काही येतंय का?’ असं विचारताच भाकरेंनी त्यांना भारूड म्हणून दाखवलं. त्यांना ते आवडलं व पुढे भाकरे त्यांच्याच कुटुंबाचा भाग असल्याप्रमाणे दर शनिवार, रविवार घरी जाऊ लागले. अशोकजींनीसुद्धा भारूड कलेबद्दल त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. पुढे अशोकजींना सोंगी भारुडाचे शूटिंग करायचे होते. अशोकजींनी इंडियन नॅशनल थिएटरच्या तंत्रज्ञांच्या सोबतीने भाकरेंना घेऊन सोंगी भारुडाचे शूटिंग केले. त्यांना आणि आय.एन.टी.च्या कर्मचाऱ्यांना ते फारच आवडले. इथूनच निरंजन भाकरेंच्या भारूड प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

भाकरेंची भारुडं महाराष्ट्रभर गाजू लागली. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे मिळवली. पुढे त्यांनी १९९६ ते २०००मध्ये व्यसनमुक्ती पहाट अभियानात सतत चार वर्षे प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली. अशीच यशाची उंच शिखरे गाठत असताना पुन्हा अशोकजींनी भाकरेंचे सोंगी भारूड मुंबईकरांना दाखवायचे ठरविले. त्या अनुषंगाने अशोकजी निरंजन भाकरेंच्या भारुडाची जाहिरातसुद्धा वर्तमानपत्रातून स्वतः प्रसिद्ध करत होते.

या प्रयोगानंतर निरंजन भाकरेंचे आयुष्यच बदलून गेले. त्यातच पुढे दया पवार प्रतिष्ठान संकल्पनेतून तसेच डॉ. प्रकाश खांडगे यांच्या लेखणीतून “लोकोत्सव” हा कार्यक्रम ठाणे येथे संपन्न होणार होता. त्या कार्यक्रमातदेखील भारूड सादर करण्याची संधी भाकरेंना चालून आली. भाकरेंनी सादर केलेला बुरगुंडा अशोक हांडेंना खूप आवडला. पुढे त्यांनी “मराठी बाणा” या आपल्या कार्यक्रमात भाकरेंना बुरगुंडा सादर करण्याची संधी दिली गेली आणि भारूडकार निरंजन भाकरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले. भारूडकार म्हणून प्रकाशझोतात असतानाच त्यांना २००७चा राज्य सांस्कृतिक लोककला पुरस्कार त्यांच्या पत्नीसह जाहीर झाला.
‘मराठी बाणा’मुळे महाराष्ट्रसह गोवा, गुजरात, मध्यप्रदेश इतकेच काय तर अमेरिकेतील शिकागो इथल्या रसिकांनादेखील त्यांच्या बुरगुंडा भारुडाची जादू अनुभवायला मिळाली. परंतु या दरम्यान, वडीलभावाने भाकरेंना घर आणि गावापासून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. संपत्तीचं वाटप व्हावं म्हणून तगादा लावला. अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना सोबतीला असलेले कलावंत त्यांच्यापासून तोडले. पण त्याही परिस्थितीत शिवसिंग राजपूत या सोंगाड्या सहकाऱ्याने भाकरेंना मदतीचा हात दिला. हिमतीने भाकरेंनी पुन्हा पार्टी बांधली. पुन्हा एकदा एकनाथी भारूड गाजू लागले. त्याचेच फळ म्हणून सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा, धिना धिन धा, ट्रिक्स मिक्स रिमिक्स, दम दमा दमा, मराठी पाऊल पडते पुढे, अखिल भारतीय नाट्य संमेलने, साहित्य संमेलने, लोककला संमेलने, संत गाथा अशा अनेक लोकप्रिय कार्यक्रमांतून त्यांनी आपले लोककलेचे सादरीकरण केले.

भारुड या लोककला प्रकाराला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देणारे भारुडरत्न निरंजन भाकरे यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. मातीतल्या लोककलेला ओळख मिळवून देणारा सच्चा कलाकार हरपला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना! pic.twitter.com/7CUjXl3krb

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 23, 2021

आपल्या प्रतिभेच्या जोरावर निरंजन भाकरे परव्युतर पदवी घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत येऊन विद्यार्थ्यांना भारुडाचे प्रशिक्षण देत आहेत. पौराणिक दृष्टांत देत आज २१व्या शतकातील समकालीन नमुन्यांची त्यास जोड देत आहेत. रहिमाबादसारख्या दुर्गम भागातून आलेल्या भाकरेंचे सामाजिक भानही तितकेच प्रखर आहे. लोककलांचे जतन, संवर्धन व्हावे म्हणून धडपड करणे हा त्यांचा स्थायीभाव आहेच, पण सपत्निक देहदानाचा संकल्प करणारे भाकरे हे पहिले लोककलावंत आहेत. कला आणि माणुसकीप्रती अविचल निष्ठा जपणारा हा कलावंत खऱ्या अर्थाने भारूड लोककला परंपरेचे वैभव ठरलाआहे.

– डॉ. गणेश चंदनशिवे

(सौजन्य – दिव्य मराठी रसिक)

You Might Also Like

गृहकलह… शरद पवारांचे वारसदार कोण  ?

राजकारणाचे उद्योग; उद्योगाचे राजकारण

आघाडीत बिघाडी… काँग्रेस-शिवसेनेच्या नव्या दोस्तीची सुरुवात

‘सततची तोंडपाटीलकी’ नडली… अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करतीय

लगाम लावाच…आता नाही सहन होत…

TAGGED: #Burgunda #lost #BharudaratnaNiranjanBhakre, #बुरगुंडा #हरपला #भारुडरत्न #निरंजनभाकरे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑक्सिजनसाठी शरद पवार मैदानात, १९० साखर कारखान्यांना दिले आदेश
Next Article ‘भारूडरत्न’ निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?