Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोल्हापुरात बस – कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू तर तीन जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

कोल्हापुरात बस – कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू तर तीन जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/10/23 at 2:10 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. भर रस्त्यात हा अपघात झाल्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे इथं हा भीषण अपघात झाला आहे. बस आणि भरधाव इनोव्हा कार एकमेकांसमोर धडकली. यामध्ये कार पुढच्या बाजूने पूर्णपणे बसच्या इंजिनमध्ये शिरल्याचं सांगण्यात येत आहे. तर फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कारचा चुरा झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

भर रस्त्यामध्ये अपघात झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत तर स्थानिकांनीही परिसरात मोठी गर्दी केली आहे. तर अपघाती वाहनं बाजूला करून आता इतर वाहनांना जागा देण्याते येत आहे.

अपघात घडताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी 3 जखमींना उपचारासाठी नजिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर कारमधून चौघांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #कोल्हापूर #भीषण #अपघात #बस-इनोव्हाकार #चारजागीचठार #तीनजखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपाकडे कार्यकर्त्यांची फळी; मात्र नाथाभाऊंकडून समाजोपयोगी कामे करुन घ्या
Next Article मोफत लसीचा समाचार : सत्ता नाही आली तर भाजपा गरीबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार का ?

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?