Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मद्यधुंद चालकामुळे कार बीआरटीच्या बसथांब्याला धडकली; दोन ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

मद्यधुंद चालकामुळे कार बीआरटीच्या बसथांब्याला धडकली; दोन ठार

Surajya Digital
Last updated: 2021/12/09 at 5:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुण्याच्या येरवडा- नगर रस्त्यावरील खराडी चौकात बीआरटी बसथांब्याला चार चाकी धडकून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात काल बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास झाला.

कारने मद्यधुंद चालकामुळे भरधाव वेगात येऊन बीआरटी बसथांब्याला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमी युवकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव वेगाने निघालेली ब्रिजा कार (एम एच १२ क्यूएफ ९३६३) खराडी बायपास येथील बीआरटी बस थांब्याला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

वाघोली च्या दिशेने भरधाव निघालेली ही कार बीआरटी थांब्याला एवढ्या जोरात धडकली की, कारच्या पुढच्या बाजूचा चुराडा झाला आहे. कारमध्ये चौघेजण होते. त्यापैकी कार चालक संकेत रामचंद्र भुजबळ (वय २२, रा. साइनगरी, चंदननगर) व ओम राहुल पवळे (वय १७, रा. किनारा हौसिंग सोसायटी, कसबा पेठ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गौरव संजय साठे (वय २२, संभाजी नगर, वाघोली) व प्रफुल्ल अंकमंची (वय २१, रा. बिडी कामगार नगर चंदननगर, खराडी.) हे दोघे जखमी आहेत.

सहाय्यक पोलीस फौजदार नामदेव सुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चौघेही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. चार चाकीचा वेग सुमारे १४० किमी च्या आसपास होता.

काही प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात पाहिला. चारचाकी चालक मयत संकेत भुजबळ यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती विमानतळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव यांनी दिली आहे. यातील मयत संकेत भुजबळ हा तरुण भाजपा पदाधिकारी होता. इतर महाविद्यालयीन युवक होते.

You Might Also Like

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक

एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे

एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे

अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं

अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख

TAGGED: #car #BRT #busstop #drunk #driver #Twokilled, #मद्यधुंद #चालक #कार #बीआरटी #बसथांबा #धडकली #दोनठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगोल्यात क्रिकेट सामन्याच्या बक्षीस वितरणात वाद; बेदम मारहाणीत झाला मृत्यू
Next Article सोलापुरातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या

Latest News

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र June 12, 2025
एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
महाराष्ट्र June 12, 2025
एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र June 12, 2025
विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
देश - विदेश June 12, 2025
अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
देश - विदेश June 12, 2025
शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
महाराष्ट्र June 12, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?