पुणे, 16 एप्रिल (हिं.स.)।
कोथरूडमधील एका उद्योजकाचा बिहारमध्ये खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या उद्योजकास ‘सायबर बिझनेस ट्रॅप’ रचून बोलावून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पाटणा एअरपोर्ट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डी.पी. रस्ता, कोथरूड) असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मननपूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटली असून, ते पुण्यातील उद्योजक लक्ष्मण शिंदे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शिंदे यांची खेड शिवापूर येथे ‘रत्नदीप सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेअरिंग कंपनी आहे. त्यांची सेंट्रिफ्युगल कास्टिंग संबंधी शिवराज सागी नावाच्या व्यक्तीशी फोन आणि ई-मेलवर व्यावसायिक चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांना पाटणा येथे बोलावण्यात आले. ११ एप्रिल रोजी शिंदे विमानाने पाटणा येथे गेले. तेथे पोहोचल्यानंतर ते मुलीशी फोनवर बोलले. त्यांनी रात्री साडेआठ वाजता व्हॉटसॲपवर संदेशही पाठविला. त्यात ‘मी आता झारखंडला कोळसा खाणीत प्लांट क्रमांक तीनमध्ये बाराशे फूट खाली मशिन आणि साधने पाहण्यासाठी जात आहे.