Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आम्ही राजभवनात कधीतरी यायचो, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रपतींसमोर विरोधकांना टोला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

आम्ही राजभवनात कधीतरी यायचो, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रपतींसमोर विरोधकांना टोला

Surajya Digital
Last updated: 2022/02/11 at 6:26 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई – विरोधात असताना आम्हीदेखील वर्षातून एखादवेळा शिष्टमंडळ घेऊन राजभवनात येत असू, अगदी दररोज येत नव्हतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना टोला लगावला.

आम्ही तेव्हा राज्यपाल महोदयांना भेटायचो. त्यांच्या कानी आमच्या व्यथा घालत होतो. आजसुद्धा आवश्यकता असेल तेव्हा आमचा संवाद सुरु असतो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. ते आज शुक्रवारी राजभवनातील दरबार हॉलच्या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलत होते.

या कार्यक्रमाला रामनाथ कोविंद याच्यांसोबत श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच निवडक मंत्री उपस्थित होते. दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला आहे. या दरबाराची आसन क्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता २२५ इतकी होती. नव्या सभागृहाला बाल्कनी आणि समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी उभारण्यात आली आहे.

आपल्या संविधानानुसार, ‘आम्ही भारताचे लोक’ हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा उद्घाटन सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे. राजभवनासह दरबार हॉल देखील लोककल्याणकारी उपक्रमांसाठी एक प्रभावी केंद्र बनेल, असे उद्‍गार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काढले. We used to come to Raj Bhavan sometime, the Chief Minister’s Tola Raj Bhavan in front of the President

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

महाराष्ट्रातील राजकीय हवा कशीही असो, पण राजभवनातील हवा नेहमीच थंड असते. महाराष्ट्रातील राजभवन हे देशातील सर्वात सुंदर राजभवन आहे. राजभवनाच्या एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शहरातील जंगल म्हणावं अशी झाडांची गर्दी आहे.

शहरात असूनही पावसाळ्याच्या सुरुवातीला राजभवनात थुईथुई नाचणारे मोर पाहायला मिळतात. तर कधीही याठिकाणी सर्पमित्रांनी पकडेले विषारी सापही पाहायला मिळतात, अशी सूचक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ८ डिसेंबर २०२१ रोजी नव्या दरबार हॉलचे उदघाटन होणार होते. पण तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा स्थगित करण्यात आला. यानंतर आता आज शुक्रवारी (ता. ११) रोजी राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन पार पडले.

या कार्यक्रमाला श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अनेक मंत्र्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या उपस्थितीवरुन जोरदार टोला लगावला.

□ लतादीदींविषयी शोकभावना

अनेकदा महाराष्ट्रात यायची संधी मिळाली, मात्र यावेळच्या प्रवासात मला एक पोकळी जाणवतेय. असे सांगून राष्ट्रपतींनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याविषयी शोकभावना व्यक्त केल्या. त्याच्यासारखी महान प्रतिभावान गायिका शतकात एकदाच जन्माला येतात. लताजींचे संगीत अमर आहे, जे सर्व संगीत प्रेमींना नेहमीच मंत्रमुग्ध करेल. यासोबतच त्यांच्या साधेपणाची आणि सौम्य स्वभावाची आठवणही लोकांच्या मनावर उमटणार आहे. मला व्यक्तिश: त्यांचा स्नेह मिळाला. त्यांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. असे राष्ट्रपती म्हणाले.

 

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी

अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात

लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ

TAGGED: #used #RajBhavan #sometime #ChiefMinister #front #President, #राजभवन #मुख्यमंत्री #राष्ट्रपती #विरोधकांना #टोला #राजभवन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ठाकरे सरकारचे मंत्री बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा
Next Article अभिनेत्री रविना टंडनचे वडिल आणि दिग्दर्शक रवि टंडन यांचे निधन

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?