Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मी ऋषभ पंत… एसटी चालकाने केली मदत, बसमधील प्रवाशांनी ओळखले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळदेश - विदेश

मी ऋषभ पंत… एसटी चालकाने केली मदत, बसमधील प्रवाशांनी ओळखले

Surajya Digital
Last updated: 2022/12/31 at 9:36 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

नवी दिल्ली : क्रिकेटपटू ऋषभ पंतचा कार अपघात झाल्यानंतर सर्वात आधी त्याच्या मदतीसाठी हरयाणाचा बस ड्रायव्हर धावला.  Me Rishabh Pant… Helped by ST driver, Car accident cricketer recognized by bus passengers ‘मी आणि माझ्या कंडक्टरने पंतला कारच्या बाहेर काढले, ऋषभ कोण आहे, याची माहिती मला नव्हती, यावेळी ‘मी क्रिकेटपटू ऋषभ पंत आहे’, अशी माहिती पंतने आपल्याला दिली, मात्र मला वाटले असेल कुणी क्रिकेटर, आम्ही क्रिकेट जास्त पाहत नाही, आम्ही फक्त मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याला वाचवले,’ असे सुशीलने सांगितले.

पोलिसांनी पंतचा जबाब नोंदवला असून दिल्लीहून रूरकीला जाताना तो स्वत:च गाडी चालवत होता. प्रवासादरम्यान त्याला एक डुलकी लागली आणि त्याचे कारवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकाला धडकून काहीवेळा पलटी झाली. त्यानंतर क्षणार्धात कारने पेट घेतला. जीव वाचवण्यासाठी विंडस्क्रिन फोडून पंत बाहेर पडला.

 

पंतच्या गाडीचा अपघात झाला त्यावेळी समोरून येणारी एसटी बस पहिल्यांदा थांबली. एसटी चालक सुशील मान यांनी कारकडे धाव घेतली. त्यावेळी काच फोडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नातील पंतला सुशील मान याने इतरांच्या मदतीने कारमधून बाहेर काढले. तोपर्यंत एसटीचे वाहक परमजीत यांनी रुग्णवाहिकेला संपर्क साधला. या दोघांच्या प्रसंगावधानामुळे पंतचा जीव वाचला. म्हणून या दोघांचाही स्वातंत्र्यदिनी उत्तराखंड सरकार विशेष सन्मान करणार आहे.

अपघातस्थळी सर्वात पहिल्यांदा थांबलेल्या एसटीचा चालक पंतला कारमधून बाहेर काढण्यासाठी धावला. मात्र तो क्रिकेट पाहत नसल्यामुळे पंतला ओळखत नव्हता. त्या एसटीमधील अन्य प्रवाशांनी पंतला ओळखले. शिवाय पेटत्या कारमधून बाहेर काढल्यानंतर पंतने स्वतःची ओळख सांगितली. त्यानंतर ही बातमी काही क्षणात जगभर पसरली.

 

वेगातील कार इतक्या जोरात दुभाजकाला धडकली की ती काहीवेळा पलटी झाली. त्यात कारची इंधन टाकी फुटली. टाकीतील ज्वालाग्रही इंधन रस्त्यावर सांडले. पलटी होताना झालेल्या घर्षणामुळे ठिणगी पडली. त्यामुळे ज्वालाग्रही इंधनाला आग लागली. त्यातून कारने जागेवरच पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप घेतले. पुढच्या काही वेळातच कार जळून भस्मसात झाली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

रिषभ पंत. भारतीय क्रिकेट संघातला स्फोटक फलंदाज अन् सावध यष्टिरक्षक. धोनीच्या जागेवर आलेला एक तरणाबांड क्रिकेटपटू. श्रीलंका दौऱ्यात निवड न झाल्याने नाराज होऊन दिल्लीतून घराकडे निघालेला. भल्यापहाटे उठल्यामुळे झोप नीट न झालेली. त्यात तो स्वतःच गाडी चालवत असलेला. गाडी होती सुसाट. त्यावेळी पहाटेच्या साखरझोपेने पंतवर केले आक्रमण. वा-याच्या वेगाने धावत असताना लागली डुलकी. या डुलकीने केला घात आणि त्याच्या गाडीचा झाला अपघात.

काही क्षणातच गाडीने घेतला पेट आणि आगीने घेतले रौद्ररूप. पण समोरून आलेली एस. टी. थांबली अन् ड्रायव्हर खाली उतरून पेटत्या गाडीजवळ आला. काच फोडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नातील पंतला आगीच्या तावडीतून सोडवले. म्हणून तो वाचला.

श्रीलंका दौऱ्यासाठी निवड समिती घेणार असलेल्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेला पंत संघात स्थान न मिळाल्याचे कळताच शुक्रवारी पहाटे दिल्लीतून आपल्या उत्तराखंडमधील घराकडे निघाला होता. श्रीलंका दौऱ्यासाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे तसा तो नाराजच होता. त्याच नाराजीतून गुरूवारी रात्री झोपी गेलेला पंत शुक्रवारी भल्या पहाटे उठून स्वत:च कार चालवत निघाला.

 

रूरकी बॉर्डरजवळ आल्यानंतर त्याची कार रस्त्यातील दुभाजकाला धडकली. त्यानंतर काहीवेळा पलटी होऊन ती रस्त्याच्या कडेला पडली. त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतला डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून पाय फ्रॅक्चर झाला आहे.

 

You Might Also Like

राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार

विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन

चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर

ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन

प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार

TAGGED: #RishabhPant #Helped #bySTdriver #Caraccident #cricketer #recognized #bybuspassengers, #ऋषभपंत #एसटीचालक #मान #मदत #बस #प्रवाशी #ओळखले #क्रिकेटपटू #कारअपघात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिर्डीजवळ साई पालखीवर गोळीबार, कारण वाचून व्हाल थक्क
Next Article कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर आज सरत्या वर्षाला निरोप, सोलापुरात चोख बंदोबस्त

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?