Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गणेशमूर्ती विसर्जनला गेलेला युवक गेला वाहून, तपास कार्य सुरु   
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

गणेशमूर्ती विसर्जनला गेलेला युवक गेला वाहून, तपास कार्य सुरु   

Surajya Digital
Last updated: 2021/09/12 at 10:35 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मोहोळ : मोहोळ  रेल्वे स्टेशनजवळील स्लीफर फॅक्टरीतील दीड दिवसाच्या गणेशोत्सवातील ‘श्री’ गणेश मूर्तीचे आष्टे बंधाऱ्यावरील सिना नदीच्या पात्रामध्ये  विसर्जन करण्यास गेलेला युवक वाहुन गेल्याची घटना काल शनिवार दुपारी तीनच्या सुमारास  घडली असून आज रविवारी सायंकाळपर्यंत शोध कार्य सुरु आहे. परंतु आणखी तो मिळून आला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ स्टेशनजवळ रेल्वे रूळाखालील सिमेंटचे स्लीफर  तयार करणारा कारखाना आहे. या कारखान्यातील कामगार गेली अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा करतात. या ठिकाणी ‘ श्री ‘ गणेशाच्या मूर्तीचे दीड दिवसात विसर्जन केले जाते. त्या अनुषंगाने शनिवारी (ता .11 ) कंपनीचे  काही कामगार एका चारचाकी वाहनामध्ये ‘श्री ‘ गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मोहोळ शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या  सिना नदीवरील आष्टे बंधाऱ्यावर गेले होते.

त्या कामगारापैकी सौरभ सुभाष बेंबलगे (रा. लातुर , वय वर्ष 20 ) , हा पोहण्यास येत असलेला युवक मोठ्या उत्साहाने श्री मुर्ती घेऊन नदीच्या  खोल पात्रात उतरला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अलीकडील काही दिवसामध्ये भोगावतीसह सिनानदीला आलेल्या पुरामुळे पाण्याला वेग होता. परिणामी पाण्याच्या वेगाचा व खोलीचा अंदाज न आल्याने क्षणातच सौरभ बेंबलगे हा युवक  पाहता पाहता नदीच्या पात्रात गायब झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी एका व्यक्तीने सांगितली.

यावेळी उपस्थित कंपनीचे कामगार  मोठमोठ्याने ओरडण्याशिवाय काहीच करू शकले नाहीत. सदर घटना पोलीस प्रशासनाला समजताच ग्रामरक्षक दलाचे  दत्तात्रय मोटे यांना घटनास्थळी पाठविण्यात आले . बघ्यांची गर्दी हटविण्याबरोबरच स्थानिक  कोळ्यांच्या मदतकार्यातही होमगार्ड दत्तात्रय मोटे सहकार्य केले.

तहसिलदार राजशेखर लिंबाळे यांनी उशीरा घटनास्थळी भेट देऊन तलाठी , ग्रामसेवक व कोतवाल यांना काही सुचना देत आदेश दिले.  तपास पोलीस  करीत आहेत . दरम्यानच्या कालावधीमध्ये  सिनानदीच्या पात्रामध्ये वाहुन गेलेल्या  युवकांचा शोध घेण्यासाठी  सिनानदीकाठालाच असलेल्या कोळेगांव येथील मच्छीमार बांधव अनुक्रमे ज्ञानेश्वर भुई , हरिचंद्र भुई , दत्ता भुई , लक्ष्मण भुई , सिंकदर पठाण,  दिपक भुई  व लक्ष्मण मल्लाव  या सर्वांनीच त्यांच्याजवळच्या उपलब्ध  साधनानिशी वेगाने वाहणाऱ्या सिना नदीच्या पात्रात बुडलेल्या युवकांचा शोध घेण्याचा  प्रयत्न आज रविवारी सायंकाळपर्यत सुरु होता. आष्टे बंधाऱ्यापासून लांबोटीपर्यंत मच्छीमार कोळी बांधवांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला  परंतू वाहत गेलेला  युवक संध्याकाळपर्यत मिळून आला नाही.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #youth #went #immersion #Ganeshmurti #carried #Investigation #started, #गणेशमूर्ती #विसर्जनला #युवक #वाहून #तपास #कार्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अल्पवयीन तरुणीवर बलात्कार तर दुसरीकडे नवविवाहित परिचारिकेची आत्महत्या
Next Article रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता! तीन दिवस राज्यात कुठे-कुठे पडणार अतिमुसळधार पाऊस

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?