Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पैशासाठी डॉक्टर पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; बंदुकीचा दाखविला धाक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पैशासाठी डॉक्टर पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; बंदुकीचा दाखविला धाक

Surajya Digital
Last updated: 2021/12/10 at 9:40 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी :  पैशासाठी डॉक्टर पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अक्षयकुमार अरुण अडाले ( पती), अरुण निवृत्ती अडाले (सासरा) (दोघे रा. भुतवाडा रोड, जामखेड जि.अहमदनगर) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सौ. हर्षदा अक्षयकुमार अडाले हल्ली (रा. उपळाई रोड, क्रांतीसिंह नगर, बार्शी ) यांनी फिर्याद दिली आहे.

हर्षदा यांचे सन 2017 साली अक्षयकुमार यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. लग्नात वरदक्षिणा म्हणून दोन लाख रुपये रोख रक्कम व पंधरा तोळे सोने तसेच इतर संसारोपयोगी साहित्य, कपाट, फ्रिज, दिवाण व इतर साहित्य दिले होते.

लग्नानंतर एक वर्ष त्यांना व्यवस्थित नांदविले. त्यानंतर सासरे अरुण त्यांना प्रकृतीवरुन तू डॉक्टर असून तुझ्या अंगात नुसती हाडेच दिसतात, तुला घरातील कामे व स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाहीत, तु वाळली कशी आहेस असे  म्हणून सतत टोमणे मारुन सतत मानसिक त्रास देवु लागले.

सासरे स्वत:चे क्लिनिक टाकण्यासाठी व नविन घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण असे म्हणून वारंवार मानसिक छळ करुन मारहाण करत होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांना उलट प्रतिउत्तर केले की घरातील बंदुकीचा धाक दाखवून तुला खल्लास करीन, अशी धमकी देत होते.

फिर्यादीला वडिलांनी लग्नात घातलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्यांचे आई वडिल व भाऊ प्रविण वराळे असे 22 नोव्हेंबर 2021 रोजी भांडणतंटा मिटवण्यासाठी आल्यानंतर पती व सासरे यांनी शिवीगाळ करुन मारहाण, दमदाटी केली.

त्यामुळे फिर्यादी आई वडिलांसोबत माहेरी आल्या. वेळोवेळी समजावून सांगूनही पती व सासरे यांचे वागण्यात काहीएक फरक पडत नसल्यामुळे शारीरिक व मानसिक त्रास असह्य झाल्याने त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* दहिगावात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेच्या घरातून रोख रकमेसह सव्वा लाखाचे दागिने लुटले

 सोलापूर : नातेपुते – दहिगाव (ता. माळशिरस) येथे सशस्त्र दरोडेखोरांनी एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवीत त्यांच्या अंगावरील दागिने आणि रोकड असा सव्वा लाखाचा ऐवज लुटून नेला. ही घटना बुधवारी (ता. 8) पहाटेच्या सुमारास घडली.
घटनेच्या आदल्या दिवशी मंगळवेढा तालुक्यात दरोडेखोरांनी एका वृद्ध महिलेचा खून करून त्यांच्या अंगावरील दागिने लुटले होते. ही घटना ताजी ताजी असताना पुन्हा हा प्रकार घडल्याने दहिगाव परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दहिगाव ( ता.माळशिरस) येथे केसर चंद्रकांत डोईफोडे (वय 64) या त्यांच्या नात्यातील अरुण रोकडे यांच्या सोबत राहण्यास आहेत. बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास चौघा चोरट्यांनी किचन रूमच्या खिडकीवरून टेरेसवर प्रवेश केला. त्यांचा आवाज आल्याने केसर डोईफोडे या जागे होऊन बाहेर पाहण्यास गेल्या. तेव्हा चौघा दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत  त्यांच्या खोलीत नेले.  त्यांच्या कपाटातील 46 हजार रुपये रोख आणि अंगावरील दागिने असा सव्वा लाखाचा ऐवज लुटला.
अरुण रोकडे  यांनी  रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांचा मोबाईल फोडून टाकला.  तेथून पसार झाले. या घटनेची फिर्याद केसर डोईफोडे यांनी नातेपुते पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांना चौघा विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक सोनवलकर हे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Filed #case #doctor #harassing #wife #money, #पैशासाठी #डॉक्टर #पत्नीचा #छळ #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भावपूर्ण श्रद्धांजली ! जनरल बिपीन रावत अनंतात विलीन; चार देशाच्या अधिकाऱ्यांची मानवंदना
Next Article महाराष्ट्राची चिंता वाढली, आज ओमिक्रॉनचे 7 नवीन रुग्ण आढळले, रुग्णसंख्या गेली 17 वर

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?