Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धार्मिक भावना दुखावल्या, ‘जाट’ चित्रपटातील अभिनेता सनी देओलसह संपूर्ण टीमवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

धार्मिक भावना दुखावल्या, ‘जाट’ चित्रपटातील अभिनेता सनी देओलसह संपूर्ण टीमवर गुन्हा दाखल

admin
Last updated: 2025/04/18 at 3:53 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

चंदीगड , 18 एप्रिल (हिं.स.)।अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुडा यांची मुख्य भूमिका असलेला ‘जाट’ सिनेमा १० एप्रिल रोजी रिलीज झाला आहे.या सिनेमाने रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली. मात्र काही दिवसातच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली जाट चित्रपटाच्या संपूर्ण टीमवरच आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘जाट’ चित्रपटातील एका दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता सनी देओल, रणदीप हुडा, विनीत कुमार सिंह, दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी आणि निर्माता नवीन येरनेनी यांच्याविरुद्ध पंजाबमधी जालंधरच्या सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’जाट’ चित्रपटात प्रभु येशू ख्रिस्ताचा अपमान केल्याच्या आरोपावरून ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदनही सादर केले.

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत तक्रारदाराने आरोप केला आहे की, “‘जाट’ चित्रपटातील क्रूसावर चढवण्याच्या दृश्यात प्रभु येशू ख्रिस्ताची नक्कल केली जाते आणि त्याची खिल्ली उडवली जाते, ज्यामुळे ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात”, असे म्हटले आहे.

चित्रपटातील दृश्यात मुख्य खलनायकाची भूमिका करणारा अभिनेता रणदीप हुडा एका चर्चमध्ये पवित्र व्यासपीठावर असलेल्या क्रूसाखाली उभा आहे. तर इतर सदस्य प्रार्थना करताना दिसत आहेत. त्यात चर्चमध्ये गुंडगिरी आणि धमकीचे चित्रीकरण देखील आहे, जे समुदायाला अत्यंत आक्षेपार्ह वाटले आहे. यापूर्वी, ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांनी या दृश्यावर आक्षेप घेतला होता आणि चित्रपटावर बंदी घालण्याची धमकी दिली होती. त्यापैकी अनेकांनी जाट चित्रपटातील “हे दृश्य चर्चच्या सर्वात पवित्र जागेचे – व्यासपीठाचे अपवित्रीकरण आहे”, असे देखील म्हटले होते.

You Might Also Like

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माची सिनेसृष्टीत एन्ट्री

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांनी भारतामधील ५ राज्यातील विद्यार्थ्यांवर घातली बंदी
Next Article विद्यार्थ्यांनी भारताच्या प्राचीन ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार जगभरात करावा – ओम बिर्ला

Latest News

एमआयडीसी आग – दुर्घटना होऊ नयेत यासाठी उपसमिती गठीत करण्याचे निर्देश
सोलापूर May 21, 2025
नॅशनल हेरॉल्ड : राहुल,सोनियांना 142 कोटींचा लाभ
देश - विदेश May 21, 2025
पाकिस्तान: सिंधू नदीच्या पाण्यावरून गोंधळ, निदर्शकांनी गृहमंत्र्याचे घर जाळले
देश - विदेश May 21, 2025
छत्तीसगड : बसवा राजूसह 30 नक्षलवादी ठार
Top News May 21, 2025
कोल्हापूरमध्ये तिघांना कोरोनाची लागण; एका रुग्णाला डिस्चार्ज
महाराष्ट्र May 21, 2025
पुतिन यांनी शांतता चर्चेला विलंब केला तर रशिया चर्चेतून बाहेर पडू शकतो – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री
देश - विदेश May 21, 2025
राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा
महाराष्ट्र May 21, 2025
उष्णतेचा धोका : देशातील दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश
महाराष्ट्र May 21, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?