मुंबई, 10 सप्टेंबर। लालबागच्या राजाच्या विसर्नजाला उशीर झाल्यानंतर सोशल मिडियावर अनेकांनी रिल्सच्या माध्यमातून त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, ‘लालबाग राजा’च्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांसंदर्भात एक रिल बनवून शेअर करण्यात आला. हे रिल शूट केल्याप्रकरणी एका फोटोग्राफरवर काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लालबाग राजाच्या विसर्जनादरम्यान पोलिस गर्दीतून राजाची वाट मोकळी करत असताना फोटोग्राफरने आपल्या रिलमध्ये चुकीचा मेसेज देत तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. या व्हिडिओत प्रामुख्यान लालबाग राजाचे दर्शन श्रीमंतांसाठी सोईस्कर आणि सर्व सामान्यांसाठी खडतर अशाप्रकारे दाखवण्यात आले होते. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी समाज माध्यमात खोटी व बदनामीकारक विधान केल्याने पोलिसांनी संबधितावर गुन्हा दाखल केला आहे.
या अगोदर लालबागचा राजा मंडळ गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. समुद्राला मोठी भरती असल्याने लालबाग राजाचे विसर्जन रविवारी (7 सप्टेंबर) विलंबाने झाले. या सगळ्याबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून मंडळाची बदनामी केली. त्यामुळे वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय लालबाग राजा मंडळाने घेतला होता.
