मनमाड, 28 जुलै – शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्यामुळे त्यांच्या विरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नांदगाव भाजप तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी फिर्याद दाखल केली. त्यांनी म्हटले की, एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यासह भारतीय जनता पक्षाविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे महाजन यांची सार्वजनिक प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सानप यांनी मागणी केली की, संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी आणि पोलिसांनी या प्रकरणात तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा, भाजप कार्यकर्ते लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील आणि राज्यभरात संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.