Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बायको वरातीत नाचल्याने नवऱ्याने केली पट्ट्याने मारहाण; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

बायको वरातीत नाचल्याने नवऱ्याने केली पट्ट्याने मारहाण; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2023/06/14 at 7:32 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● अज्ञात चोरट्याने मोबाईलसह साहित्य चोरले

सोलापूर : वरातीत का नाचली या कारणावरून नवऱ्याने बायकोला पट्ट्याने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १२ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वैद्यवाडी भवानी पेठ शेळगी रोड येथे घडली. Husband beats wife with belt for dancing in Varati; A case has been registered against three people along with the husband, Solapur Bhawani Peth

याप्रकरणी काजल किरण गुडील (वय-२५,रा. वैदवाडी, भवानी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे फिर्याद दिली. यावरून पती किरण गोविंद गुडील,सासरे गोविंद गुडील, दुर्गा गोविंद गुडील (रा.वैदवाडी,भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचे पती किरण याने काजल यांना वरातीत का नाचलीस या कारणावरून पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर पट्ट्याच्या स्टीलचा बक्कल पायाच्या पंजावर लागून काजल या जखमी झाले.

फिर्यादीची आत्या आणि त्या रामा वरघंटी या भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील सासरे गोविंद यांनी कपाळावर हाताने ठोसा मारून फिर्यादीची आई यांना देखील दुर्गा यांनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पैकेकरी हे करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● अज्ञात चोरट्याने मोबाईलसह साहित्य चोरले

 

सोलापूर : अज्ञात चोरट्याने फिर्यादी अंजय्या नागनाथ फलमारी (वय-३६,रा. गडगी नगर,जुना विडी घरकुल) यांच्या घराच्या भिंतीवर चढून जिन्याच्या उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने फिर्यादीच्या घरातील मोबाईल,स्मार्ट वॉच व पितळी तांबे असा अकरा हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

ही घटना १२ ते १३ जून दरम्यान गडगी नगर येथे घडली.याप्रकरणी अंजय्या फलमारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे,घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील हे करीत आहेत.

● मृत्यूस कारणीभूत ; एकावर गुन्हा

 

फिर्यादी मारुती रंगनाथ ठाकूर (वय-५५,रा. क्रांतीनगर खारगाव रोड, लातूर) व त्यांची आत्या सरस्वती चंद्रकांत मोरे असे दोघेजण नातेवाईक भगवान शिंदे यांच्या मुलीचे केगाव येथे लग्न उरकून जेवण करून परत आत्याच्या घराकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी केगाव येथील रिक्षा स्टॉपकडे पायी रस्ता क्रॉस करून जाताना सोलापूर पुणे हायवे रोडवर रमेश जगदीश मिरेखोर (रा.सैफुल) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र.एमएच.१३.डीएच.२६१६ ही दुचाकी भरधाव वेगात व निष्काळजीपणाने चालून फिर्यादी यांच्या आत्याला धडक देऊन गंभीरित्यांत जखमी केले. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन स्वतःच्या हातास व पायास तसेच पाठीला मुक्कामार लागून जखमी होण्यास कारणीभूत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ही घटना १३ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली. या घटनेचा पुढील तपास पोसई भोईटे हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Husband #beats #wife #belt #dancing #Varati #case #registered #three #people #husband #Solapur #BhawaniPeth, #सोलापूर #बायको #वराती #नाचणे #नवरा #पट्ट्याने #मारहाण #पतीसह #तिघांवर #गुन्हा #दाखल #भवानीपेठ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अखेर एकनाथ शिंदेंची माघार ! नवीन जाहिरात देऊन  मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे हसे करून घेतले
Next Article अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा लाक्षणिक बंद !

Latest News

Gentle Monster Jennie Kpop Sunglasses Up to 30% Off
Top News December 6, 2025
test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?