Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Cyber crime सोलापूर । सीसीएचवर दाखल होताच गुन्हा, गंडवण्यासाठी नवा ॲप आला पुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

Cyber crime सोलापूर । सीसीएचवर दाखल होताच गुन्हा, गंडवण्यासाठी नवा ॲप आला पुन्हा

Surajya Digital
Last updated: 2022/10/19 at 11:57 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

• बुडालेला पैसा काढण्यासाठी नवा जुगाड, नवा जुगार

सोलापूर : झटपट श्रीमंत होण्यासाठी हजारो रुपये गुंतवल्यानंतर लाखो रुपये देण्याचे आमिष दाखवून शेकडो सोलापूरकरांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सीसीएच ॲपवर गुन्हा दाखल झाला. त्याचा अद्याप तपास सुरू झालेला नसतानाच सोलापूरकरांना लुबाडण्यासाठी नवा ॲप पुन्हा बाजारात अवतरला आहे. Solapur. As soon as the case is registered at CCH, a new app has come again to solve the crime

Contents
• बुडालेला पैसा काढण्यासाठी नवा जुगाड, नवा जुगारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)■ सुरुवातीला पैसे मिळतात हा समज■ तीच फाईल, तशीच स्टाईल■ कशासाठी.. ? जिथे हरवले… तिथेच शोधण्यासाठी…□ घोटाळा होण्यापूर्वीच ठोकावा टाळा – राज सलगर (सामाजिक कार्यकर्ते)

 

विशेष म्हणजे सीसीएच ॲपमधून ज्यांनी लाखो रुपये कमवले त्यांनी आणखी कमवण्यासाठी आणि ज्यांनी लाखो रुपये गमावले; त्यांनी ते मिळवण्यासाठी या नव्या ॲपमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे. बुडालेला पैसा काढण्यासाठी सुरू केलेला हा नवा जुगाड किती दिवस टिकणार आणि हा नवा जुगार किती दिवस चालणार? हे मात्र निश्चित नसल्यामुळे सोलापूरकर पुन्हा नव्या फसवणुकीत अडकतात की काय ? असा संशय निर्माण झाला आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून हजारो गुंतवल्यानंतर लाखो रुपये मिळवून देणाऱ्या सीसीएच ॲपचा धूमधडाका सोलापूर शहरात सुरू होता. गेल्या आठवड्यातच या ॲपने करोडोंचा चुना लावून रातोरात गाशा गुंडाळून पोबारा केल्यानंतर घाबराघुबरा झालेला सोलापूरकर नागरिक फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवताना दिसला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. गुन्हे शाखेने अद्याप या तपासाला हात घातलेला नाही. सोलापुरात सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे.

लाखो रुपये कमवून देणाऱ्या नव्या ॲपची चर्चा शहरात सुरू झाली आहे. त्याचवेळी हा ॲप किती दिवस टिकणार आणि किती दिवस गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळणार? हे निश्चित नसल्यामुळे दुसऱ्या बाजूला गंडवले जाण्याची भीतीसुध्दा निर्माण झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

■ सुरुवातीला पैसे मिळतात हा समज

सीसीएच ॲपचा धुमाकूळ साधारण सहा महिन्यांपासून सुरू होता. म्हणजेच सहा सीसीएचमधून परतावा मिळत होता. त्यावर अनेकजण श्रीमंत झाले. त्यानंतर सीसीएच शटडाऊन झाले. आता नव्याने आलेल्या अॅपमधूनही सुरुवातीला पैसे मिळतील. सुरुवातीलाच फसवणूक होणार नाही; म्हणून नव्या ॲपमध्ये सोलापूरकर डोळे झाकून गुंतवणूक करताना दिसत आहेत..

■ तीच फाईल, तशीच स्टाईल

 

सीसीएच अॅप गुगल प्लेस्टोरवरून इन्स्टॉल केल्यानंतर रुपयांमधील गुंतवणुकीला डॉलरमध्ये परतावा मिळत होता. अगदी सीसीएच अॅपची जी स्टाईल होती; त्याच स्टाईलचे नवे अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले असून त्याचीच सध्या सोलापूरमध्ये चलती आहे. सीसीएचचा गंडा माहीत असतानाही या नव्या अॅपमध्ये गुंतवणुकीचा फंडा जोरात सुरू झाला आहे.

 

■ कशासाठी.. ? जिथे हरवले… तिथेच शोधण्यासाठी…

कोणी कर्ज काढून, कोणी घरातले दागदागिने विकून, कोणी जागा- घर गहाण ठेवून पैसा उभा केला आणि सीसीएचमध्ये गुंतवला. शेवटच्या टप्प्यात ज्यांनी गुंतवणूक केली; विशेषत: त्यांचीच फसवणूक झाली. त्यांनी जे सीसीएचमध्ये हरवले आहे; ते शोधण्यासाठी तेच लोक या नव्या ॲपमध्ये उतरले आहेत. जिथे हरवले; तिथेच शोधायचे ही या लोकांची मानसिकता आहे.

□ घोटाळा होण्यापूर्वीच ठोकावा टाळा 

 

येणाऱ्या काळामध्ये सीसीएचप्रमाणे मोठा घोटाळा होऊ शकतो. त्या आधीच लोकांनी सतर्क झाले पाहिजे. अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये आपल्या कष्टाचा पैसा घातला नाही पाहिजे. सायबर विभागाने व पोलीस प्रशासनाने याचा तपास करून गुन्हेगारांचा शोध घेतला पाहिजे. गुन्हा घडल्यानंतर तपास करण्यापेक्षा अशा प्रकारचा गुन्हा घडूच नये यासाठी पोलीस यंत्रणेने पावले उचलली पाहिजेत.

– राज सलगर (सामाजिक कार्यकर्ते)

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #case #registered #CCH #newapp #comeagain #solve #crime #cybercrime, #सोलापूर #सीसीएच #दाखल #गुन्हा #गंडवणे #नवाॲप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई क्रिकेट असोसिएशन : सोन्याचे अंडी देणा-या कोंबडीसाठी राजकारणातील विरोधक येणार एकत्र
Next Article मोठा विजय : मल्लिकार्जुन खर्गे होणार काँग्रेस अध्यक्ष

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?