Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एखादी केस सीबीआयकडे जात असेल, ती केस देताना राज्य सरकारला विचारावं हीच अपेक्षा – मंत्री अनिल परब
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

एखादी केस सीबीआयकडे जात असेल, ती केस देताना राज्य सरकारला विचारावं हीच अपेक्षा – मंत्री अनिल परब

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 7:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करावा, अशी राज्य सरकारची भूमिका होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची बाजू मांडली.

गुन्हा महाराष्ट्रात आणि मुंबईत घडला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची एनओसी घ्यावी, असं आमचं म्हणणं होतं. कारण घटनेने जे अधिकार दिले आहेत त्यावर गदा येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने ही बाजू मांडली होती. सुशांत प्रकरणाचा तपास महाराष्ट्राकडे वर्ग करावा. भविष्यात वेळ पडली तर महाराष्ट्र सरकार हा तपास सीबीआयला देऊ शकते, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली होती. महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडताना कुठलाही विरोध केला नव्हता.

देशातील घटनातज्ज्ञांनी या केसचा अभ्यास करावा आणि आपलं मत मांडावं. कारण घटनेचं रक्षण करणं हे सर्वसामान्य माणसाचं, कार्यकर्त्याचं आणि राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे घटनातज्ज्ञांनी या निकालाचा अभ्यास करुन आपलं मत मांडावं”, असं आवाहन अनिल परब यांनी केलं.

* विरोधकांना दुसरं कामच राहिले नाही

“विरोधक काय म्हणतात यापेक्षा घटना काय म्हणते? त्याला आम्ही जास्त महत्त्व देतो. विरोधक काय म्हणतात त्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे, त्याला आम्ही जास्त महत्त्व देतो. विरोधक आरोपासाठी आरोप नक्की करतील. कारण त्यांना दुसरं काम राहिलेलं नाही. या प्रकरणानिमित्त राजकारण करणं हाच त्यांचा उद्देश आहे”, असा घणाघात अनिल परब यांनी केली.

“या केसमध्ये सुशांतची हत्या की आत्महत्या हा सुशांतचा वैयक्तिक विषय आहे. जर त्याची हत्या असेल तर जे आरोपी पकडले जातील कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची सरकार म्हणून भूमिका आहे. आत्महत्या असेल तर ते दुर्देवी आहे. पण त्यामागील कारणेदेखील समोर आले पाहिजेत”, असं अनिल परब म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“हत्या की आत्महत्या हा वेगळा विषय आहे. बिहार पोलिसांकडे असलेला विषय वेगळा आहे. राजकारण करणारे फक्त हीच गोष्ट घेऊन बसले आहेत की, आम्ही ती केस दडपू इच्छितो. महाराष्ट्र सरकारचा या केसशी काही संबंध नाही”, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

“एखादी केस सीबीआयकडे जात असेल, ती केस देताना राज्य सरकारला विचारावं ही अपेक्षा व्यक्त केली तर त्यात महाराष्ट्र सरकारची चूक नाही. त्यामुळे कुणालाही राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. कुणाला जिंकण्याचा किंवा हारण्याचा प्रश्न येत नाही”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #अनिलपरब #सुशांतसिंह #तपास #राज्यसरकार #विरोधक #काम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोठा निर्णय : सरकारी नोकरभरतीसाठी देशभरात आता एकच परीक्षा; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Next Article रुग्णालयात उपचारासाठी जाताना संजय दत्त झाला भावूक; ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’ असे केले आवाहन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?