Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: युवासेनेचा मोहोळमध्ये बैलगाडी मोर्चा, केंद्र सरकारच्या महागाईयुक्त धोरणाचा निषेध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

युवासेनेचा मोहोळमध्ये बैलगाडी मोर्चा, केंद्र सरकारच्या महागाईयुक्त धोरणाचा निषेध

Surajya Digital
Last updated: 2021/11/01 at 9:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मोहोळ : केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून केंद्र शासनाच्या या धोरणाच्या विरोधात जिल्हा युवासेना आक्रमक होऊन सोलापूर जिल्हा युवासेना च्या वतीने मोहोळ येथे बैलगाडी मोर्चा  काढला. यावेळी केंद्र सरकारच्या महागाईयुक्त धोरणाचा निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारकडून देशभरात दररोज होणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असून त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होत असून सर्वसामान्यांना याची झळ बसत आहे. सर्व स्तरातील व्यक्तींचे आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडले आहे. केंद्रातील सरकार लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले. मात्र त्यांनी जनतेला दिलेल्या शब्दांचा पूर्णपणे विसर पडला आहे.

या केंद्र शासनाच्या खोटेपणाच्या विरोधात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या सुचनेनुसार व युवासेना सहसचिव विपुल पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मोहोळमध्ये आंदोलन केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. रविवारी मोहोळ येथे बैलगाडी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या महागाई युक्त धोरणाचा निषेध करण्यात आला. मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावर बैलगाडी मोर्चा सह सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात युवासेना राज्य सहसचिव विपुल पिंगळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिपक गायकवाड, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, जिल्हा उपप्रमुख लखन शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले, माजी नगरसेवक महादेव गोडसे, माजी नगरसेवक चंद्रकांत गोडसे, माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, तालुकाप्रमुख राजरत्न गायकवाड, रणजीत गायकवाड, संजय काकडे, संजय काळे, शिवाजी पासले, भीमराव मुळे, बंडू मुळे, सचिन सुरवसे, सचिन उन्हाळे, सचिन जाधव, गणेश नाईकनवरे, संग्राम जगताप आदी उपस्थित होते.

* रेल्वे पोलिस क्वार्टरमध्ये सव्वा लाखाची घरफोडी 

सोलापूर :  घर फोडून एक लाख २० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २८ ऑक्टोंबर रोजी रेल्वे पोलिस क्वार्टर, एम ९१/४ डी. सोलापूर येथे घडली. याप्रकरणी भाग्यश्री केदार पवार (वय-३०,रा.मुरारजी पेठ,बजाज शोरूमच्या पाठीमागे सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी भाग्यश्री पवार यांच्या आई-वडिलांचे बंद घर कोणीतरी अज्ञात चोरट्याने लोखंडी दरवाजाची फळी तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातील रोख रक्कम,सोन्या-चांदीचे दागिने गॅस सिलेंडर,टीव्ही पितळीचे व स्टीलचे भांडे घरगुती साहित्य असा मिळून एकूण एक लाख १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
घरगुती वापरायचे सामान व जमिनीचे खरेदी खताचे कागदपत्रे देखील चोरून घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून  पुढील तपास पोसई गायकवाड हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Yuvasena #bullock #cart #Mohol #protesting #central #government #inflationary #policy, #युवासेना #मोहोळ #बैलगाडी #मोर्चा #केंद्रसरकार #महागाईयुक्त #धोरणा #निषेध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माझ्यावर आरोप करणारेच पळून गेले- अनिल देशमुख
Next Article माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रात्री अटक, देशमुखांची धावपळ व्यर्थ

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?