Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्र सरकारचा खादी प्राकृतिक पेंट; गायीच्या शेणापासून निर्मित रंग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

केंद्र सरकारचा खादी प्राकृतिक पेंट; गायीच्या शेणापासून निर्मित रंग

Surajya Digital
Last updated: 2021/01/14 at 10:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने गायीच्या शेणापासून निर्मित रंग देशांतर्गत बाजारपेठेत सादर केला. गायीच्या शेणापासून निर्मित या रंगाचे नामकरण ‘खादी प्राकृतिक पेंट’ असे करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या रंगाची निर्मिती जयपूरमधील ‘कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट’ने केली असून, ‘खादी आणि ग्रामोद्योग मंडळा’मार्फत (केव्हीआयसी) विक्री करण्यात येणार आहे. या रंगाला ‘भारतीय मानक ब्यूरो’नेही (बीआयएस) प्रमाणित केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भिंतीवर लावल्यानंतर हा रंग केवळ चार तासांतच वाळतो. सध्या दोन लिटरपासून ३० लिटरपर्यंतचे रंगाचे पॅकिंग करण्यात आल्याचे ‘केव्हीआयसी’तर्फे स्पष्ट करण्यात आले.

* शेणाच्या मागणीत होईल वाढ

सध्या बाजारात अस्तित्वात असलेल्या रंगांच्या तुलनेत ‘खादी प्राकृतिक पेंट’ खूपच स्वस्त आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थानिक स्तरावरच या रंगाचे उत्पादन करण्यात येणार असल्याने तो स्वस्तात उपलब्ध होईल, असेही ‘केव्हीआयसी’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेणाच्या मागणीत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ‘केव्हीआयसी’च्या अंदाजानुसार ‘खादी प्राकृतिक पेंट’ मुळे शेतकरी आणि गोशाळांना दर वर्षी प्रति जनावर ३०,००० रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

* पर्यावरणपूरक, बिनविषारी रंग

हा रंग पर्यावरणपूरक, बिनविषारी, विषाणू आणि बुरशीविरहित असल्याचा दावा ‘खादी आणि ग्रामोद्योग मंडळा’ने केला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा रंग वासरहित असून, तो डिस्टेम्पर आणि इमल्शन पेंट या दोन प्रकारांत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ‘केव्हीआयसी’ने केलेल्या दाव्यानुसार या रंगामध्ये शिसे, पारा, कॅडमियम आणि क्रोमियमसारख्या घातक धातूंचा वापर करण्यात आलेला नाही. ‘खादी प्राकृतिक पेंट’चे परीक्षण मुंबई आणि गाझियाबादमधील ‘नॅशनल टेस्ट हाउस’ आणि नवी दिल्लीतील श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रीसर्च येथे करण्यात आले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #केंद्रसरकारचा #खादीप्राकृतिकपेंट #गायीच्या #शेणापासून #निर्मित #रंग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिंदू मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मुस्लिम समाजातर्फे आर्थिक मदत
Next Article सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?