Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नूतन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्यापुढे अनेक आव्हाने; सहा अधिकाऱ्यांवर चाललाय कारभार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

नूतन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्यापुढे अनेक आव्हाने; सहा अधिकाऱ्यांवर चाललाय कारभार

Surajya Digital
Last updated: 2023/07/24 at 1:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतलेल्या मनिषा आव्हाळे यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. अनेक विभागांचा भार सांभाळताना व त्यावर नियंत्रण ठेवून आदेश कारभार दाखवून देण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. New Zilla Parishad CEO Manisha Avhale faces many challenges; Six officers are in charge

बारा अधिकाऱ्यांपैकी केवळ सहा अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेचा कारभार सध्या सुरू आहे. तो व्यवस्थित पार पाडणे. कर्मचाऱ्यांची कमतरता,शेकडो कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, प्रशासकीय राजवट अशा सर्व ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागणार आहे तसेच शिक्षण,आरोग्य, ग्रामपंचायत, समाज कल्याण, सामान्य प्रशासन, आदी विभागाचे कामकाज पहावे लागणार आहे. काम चुकार कर्मचारी यांच्यावरही अंकुश ठेवावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे हे एक भले मोठे आव्हानच असणार आहे.

जिल्हा परिषदेचा शनिवारी आव्हाळे यांनी सकाळीच आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच जिल्हा परिषदेच्या आवारात पहाणी केली. जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

 

मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना पदभार देऊन खुर्चीवर बसवले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विराजमान होणाऱ्या आव्हाळे या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत.

यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्वेता सिंगल या 10 फेब्रुवारी २०१४ रोजी जॉईन झाल्या होत्या. त्यांची बदली केवळ चार महिन्यात म्हणजे १२ जून २०१४ रोजी झाली. त्या काळात या वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यांच्यावर टक्केवारीचे आरोप झाले होते. त्यामुळे मनिषा आव्हाळे यांच्यासमोर महिला अधिकारी म्हणून एक प्रकारचे आव्हान असणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

यापूर्वी आव्हाळे यांना जिल्हा परिषदेमध्ये एक महिना सीईओ पदावर कामकाज केलेला अनुभव आहे. त्यावेळी जल जीवन मिशनच्या कामावर त्यांनी आपला फोकस केला होता. आव्हाळे या थेट आयएएस असल्याने त्यांच्या कामाची पध्दत वेगळी आहे, त्या शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांनी सुरू केलेले उपक्रम त्याची सातत्य टिकवण्याचेही आव्हान मनीषा आव्हाळे यांच्या समोर आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या सहा विभाग हे प्रभारी अधिकाऱ्यांवर चालत आहेत तसेच कर्मचाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने अशा वातावरणात आव्हाळे यांना कामकाज करावे लागणार आहे. शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, समाज कल्याण, सामान्य प्रशासन या विभागाचे कामे पहावी लागणार आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागास भेट देऊन कार्यालयातील स्वच्छता, निटनेटकेपणा तसेच अभिलेख वर्गीकरण करणे बाबत सुचना दिल्या. या प्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षण व आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व तेथील परिसराची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वानी कार्यालयीन वेळेत व वेळेवर कार्यालयामध्ये उपस्थित रहावे, आपले दप्तर कपाटामध्ये सहा संच पद्धतीने ठेवणेत यावेत. कार्यालयात ज्या ठिकाणी अस्वच्छता दिसेल तिथे स्वच्छता करुन घ्यावी. कार्यविवरण नोंदवही अद्ययावत करावी, दत्पर वर्गीकरण करुन दत्पर अभिलेख कक्षाकडे पाठवावे, आपापल्या विभागाच्या अभिलेख कक्षाची स्वच्छता करुन घ्यावी. अशा सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या.

You Might Also Like

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

TAGGED: #New #ZillaParishad #CEO #ManishaAvhale #faces #many #challenges #Six #officers #charge, #नूतन #सोलापूर #जिप #सीईओ #मनीषाआव्हाळे #आव्हान #सहा #अधिकारी #कारभार #प्रशासकीयराजवट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र हादरला…गुप्तधनासाठी नरबळी, चार अटक तर एक फरार
Next Article ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?