Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठा निर्णय : सरकारी नोकरभरतीसाठी देशभरात आता एकच परीक्षा; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

मोठा निर्णय : सरकारी नोकरभरतीसाठी देशभरात आता एकच परीक्षा; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 7:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आज बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने देशातील तरुणांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार राष्ट्रीय भरती एजन्सीला (NRA) केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे नोकरीसाठी बऱ्याच परीक्षा यापूर्वी तरुणांना घ्याव्या लागत होत्या, पण आता निर्णयामुळे केवळ एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

20 भरती एजन्सी देशात आहेत, म्हणून विविध विविध ठिकाणी प्रत्येक एजन्सीच्या परीक्षा देण्यासाठी जावे लागते. आता राष्ट्रीय भरती एजन्सी (नॅशनल रिक्रूटमेंट एजेन्सी) सामान्य पात्रता परीक्षा घेईल. कोट्यावधी तरुणांना याचा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून तरुणांकडून ही मागणी करण्यात येत होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

युवा पिढीसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. सरकारी नोकरी संदर्भात केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा (CET) देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी युवापिढी एक ना अनेक परीक्षांना सामोरे जात असतात. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि चांगल्या नोकरीच्या महत्त्वाकांक्षेने तरुण या सगळ्या परीक्षा मोठ्या आशेने देत असतात. केंद्र सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र बदलेल अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी आता सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल.

“युवकांना जागोजाही परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.” अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #केंद्रसरकार #दिलासादायकनिर्णय #ताणकमी #एकचपरीक्षा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशांतप्रकरणात सीबीआय लागली कामाला; उद्या मुंबईत दाखल होणार, महाराष्ट्र सरकार निर्णयाला देणार आव्हान
Next Article एखादी केस सीबीआयकडे जात असेल, ती केस देताना राज्य सरकारला विचारावं हीच अपेक्षा – मंत्री अनिल परब

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?