Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वेळापुरात उद्यापासून राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

वेळापुरात उद्यापासून राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 

Surajya Digital
Last updated: 2021/12/10 at 3:44 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : पुरुष व महिला गटाची ५७ वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस) येथील पालखी मैदानावर उद्या शनिवारी (११ डिसेंबर) सुरु होईल. ही स्पर्धा १३ डिसेंबरपर्यंत रंगणार आहे.

खो-खो चे आधारस्तंभ व महाराष्ट्र खो खो संघटनेचे माजी अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर. हा दिवस खो-खो दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त या राज्य स्पर्धेचे आयोजन वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ यांच्या वतीने आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोना महामारीमुळे या स्पर्धा कोरोनाच्या शासकीय सर्व नियमांचे पालन करून घेण्यात येत आहे. साखळी स्पर्धेतून विजयी व उपविजयी असे या स्पर्धेत पुरुष व महिला गटात प्रत्येकी सोळा संघ सहभागी होणार असून या स्पर्धा बाद फेरीत होतील. तीन दिवस होणाऱ्या या स्पर्धेसाठी पालखी मैदानावर खो खोची तीन क्रीडांगणे करण्यात आली असून या स्पर्धा दिवसा आणि रात्री विद्युतझोतात होतील. प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे.

* पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार ११ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होईल. यावेळी भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष महेश गादेकर, सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर हे उपस्थित राहणार आहेत. खो-खो प्रेमीनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धा सयोंजन समितीचे सचिव जावेद मुलानी यांनी केले आहे

* सोलापूरची लढत नाशिक व धुळ्याशी

असे होणार बाद फेरीचे सामने पुरुष :

मुंबई उपनगर विरुद्ध बीड, सिंधुदुर्ग विरुद्ध अहमदनगर, मुंबई विरुद्ध पालघर, रत्नागिरी विरुद्ध ठाणे, सांगली विरुद्ध जळगाव, नाशिक विरुद्ध सोलापूर, उस्मानाबाद विरुद्ध सातारा, नंदुरबार विरुद्ध पुणे.

महिला : पुणे विरुद्ध नाशिक, धुळे विरुद्ध सोलापूर, औरंगाबाद विरुद्ध सातारा, पालघर विरुद्ध उस्मानाबाद, रत्नागिरी विरुद्ध रायगड, मुंबई विरुद्ध सांगली, अहमदनगर विरुद्ध मुंबई उपनगर, जालना विरुद्ध ठाणे.

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #State #Championship #Kho-Kho #competition #tomorrow #Velapur, #वेळापुरात #उद्यापासून #राज्य #अजिंक्यपद #खो-खो #स्पर्धा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ट्रकचा भीषण अपघात; 49 जणांचा मृत्यू, 58 जण जखमी
Next Article बापरे – दहा हजार रूपये लिटर गाढविणीचं दूध

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?