Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चंद्रकांत पाटलांकडून उध्दव ठाकरेंना युतीचे आमंत्रण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

चंद्रकांत पाटलांकडून उध्दव ठाकरेंना युतीचे आमंत्रण

Surajya Digital
Last updated: 2023/04/09 at 7:37 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
○ ‘रात गई; बात गई’ बोलगे ‘तो बात बनेगी’स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● शरद पवारांच्या मागे गेल्याने माती○ टोकेंगे नही; लेकीन छोडेंगे भी नही○ आम्ही स्वागत करू

○ ‘रात गई; बात गई’ बोलगे ‘तो बात बनेगी’

 

सोलापूर : देवेंद्र फडणवीस यांचे मन मोठे आहे. ते सगळे विसरतील. जर उध्दव ठाकरे ‘रात गई बात गई’ असे बोलले तर ‘ तो बात बनेगी’. पुन्हा एकदा सर्वकाही जुळून येईल आणि अखंड हिंदुत्वासाठी पुन्हा सेना ( उध्दव ठाकरे गट ) – भाजप एकत्र येणे महाराष्ट्र हिताचे ठरेल, अशा शब्दात भाजपने नेते व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा युतीचे आमंत्रण दिले आहे.

 

‘आम्ही दरवाजा बंद करत नाही, आमचा दरवाजा नेहमीच उघडा असतो’ असे सांगत भाजप ठाकरेंसोबतच्या युतीसाठी इच्छुक असल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगळी चर्चा सुरू झाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत संकेत दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी असे घडले तर त्याचे स्वागतच केले जाईल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

स्पष्ट बोलणे टाळले असले तरी अस्पष्टपणे का होईना; चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये चाललेल्या हालचाली अप्रत्यक्षपणे बोलून दाखवल्या.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● शरद पवारांच्या मागे गेल्याने माती

 

भाजपसोबतच्या युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंकडून काही संकेत मिळाले. आहेत का ? या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना ठाकरेंकडून काहीही संकेत आलेले नाहीत. मी जसा भाजपचा नेता आहे, तसाच एक माणूस अन् महाराष्ट्राचा नागरिक आहे.

घडणाऱ्या घटनांमुळे मी व्यथित होतो, म्हणून मी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी भाजपबरोबर यावे असे म्हणतो. माझ्या पक्षात इतके स्वातंत्र्य आहे. शरद पवारांच्या मागे गेल्याने पवारांनी अनेक नेत्यांची माती केली. तसेच ते पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची माती करतील, अशी भविष्यवाणीही यावेळी चंद्रकांत पाटलांनी केली.

 

○ टोकेंगे नही; लेकीन छोडेंगे भी नही

 

देवेंद्र फडणवीसांचे मन मोठे आहे. कोणी काहीही बोलले तर सहन करणार नाही. हम किसी को टोकेंगे नहीं, किसीने टोका तो छोडेंगे भी नहीं. आम्ही कुणालाही त्रास देत नाही. उद्धव ठाकरे रात गई, बात गई’ असे म्हणाले तर एकत्र येता येईल. मात्र, नही मेरा दरवाजा बंद है असे उद्धव ठाकरेंनी ३३ महिने केले. त्यांनी एकदाही असे म्हटलं नाही की, तू घरी ये, आपण एकत्र बसू. देवेंद्र फडणवीस असे दरवाजे बंद करणारे नाहीत, अशा शब्दात भाजपकडील बाजूही चंद्रकांत पाटील यांनी समोर आणली.

○ आम्ही स्वागत करू

चंद्रकांत पाटील यांनी यांच्या मुलाखतीनंतर मुंबईत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्न करणार असतील, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. ते चंद्रकांत पाटलांच्या हातून घडणारे चांगले काम असले. चांगल्या गोष्टीला आमचे समर्थन असते.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #bjp #ChandrakantPatil's #invitation #Uddhav Thackeray's alliance, #भाजपनेते #चंद्रकांतपाटील #उध्दवठाकरे #युती #आमंत्रण, #रातगईबातगई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दुधनी बाजार समिती निवडणूक : म्हेत्रे गटाचे दोन व्यापारी सदस्य बिनविरोध
Next Article सात आमदारांसह नॉट रिचेबल; अजित पवारांची माध्यमांवर नाराजी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?