Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

‘शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही’

Surajya Digital
Last updated: 2021/12/17 at 10:32 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच त्यांनी शंकराची पूजा केली आणि हिंदू धर्माची पूजा केली. कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो, असंही ते म्हणाले.

ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. या वक्तव्यानंतर विरोधकांंकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती.

शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होट बँक तयार केली. त्यावर अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याबाबत स्पष्टीकरण देतानाही पाटील यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चंद्रकांत पाटील यांची बेधडक वक्तव्ये आणि वादाची मालिका सुरुच आहे. पुन्हा एकदा त्यांनी वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली. त्याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशीन घेऊन तयार केली. तर त्यांनी जनमत तयार केलं. त्यात चुकीचं काय? याच वक्तव्याला घेऊन कुणीतरी निदर्शनं करणार होतं. मला धमकी आली, मात्र, हम किसीको टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही, असा इशाराही पाटील यांनी दिला.

* काँग्रेसची प्रतिक्रिया, तत्काळ माफी मागा

पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपची छिंदम प्रवृत्ती आहे. व्होट बँकेच्या हीत राजकारणाशी शिवरायांचा संबंध जोडता? शिवरायांची तुलना मोदींशी? आदित्यनाथ व विजय गोयल यांनी मोदींची तुलना शिवरायांशी केली होतीच. ‘आजके शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तक भाजपनेच काढले. हे जाणीवपूर्वक करत आहेत. शिवराय हे सद्विचारांचे प्रतिक आहेत व भाजप कुविचारांचे. त्यामुळे तुलना पातकच आहे. तत्काळ माफी मागा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #ShivajiMaharaj #established #HindaviSwarajya #ChandrakantPatil #equal #religions, #शिवाजीमहाराज #हिंदवी #स्वराज्य #स्थापना #सर्वधर्म #समभाव #चंद्रकांतपाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नजिक पिंपरीत रोखलेला बाल विवाह गुपचुप केला पुन्हा; झाली सात महिन्यांची गरोदर
Next Article 2022 पर्यंत कोरोनाचा द एन्ड होईल; डब्लूएचओने दिली गुडन्यूज

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?