Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जिल्हा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसाठी आराखडा तयार करा – चंद्रकांत पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

जिल्हा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसाठी आराखडा तयार करा – चंद्रकांत पाटील

admin
Last updated: 2025/03/28 at 3:26 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

जिल्हा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसाठी आराखडा तयार करा – चंद्रकांत पाटील

सांगली, 28 मार्च (हिं.स.)।

जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक अद्ययावत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून त्याचे पुढील आठवड्यात सादरीकरण करावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिल्या. जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुलात 400 मीटर धावन मार्गाचे सिंथेटीक धावन मार्ग, बॅडमिंटन हॉलचे अद्ययावतीकरण, जलतरण तलाव दुरूस्ती, कबड्डी, खो-खो खेळाकरिता डोमची सुविधा, जलतरण तलावासाठी सौर ऊर्जा पॅनेल, बाह्यस्त्रोतातून संकुल देखभाल व कार्यालयीन कामासाठी कर्मचारी नियुक्ती, आदि कामांसाठी सविस्तर आराखडा तयार करावा व त्याचे सादरीकरण पुढील आठवड्यात करावे. ही सर्व कामे तात्काळ सुरू करून ती येत्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. क्रीडा संकुलातील सोयी-सुविधा वाजवी भाडे तत्त्वावर देण्यासाठी नियमावली तयार करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रलंबित बुद्धिबळ भवन उभारणीसंदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीसंदर्भात आराखडा तयार करण्याबाबत सूचना केल्या. तसेच, जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलच्या सद्यस्थितीची पाहणी करून तो अद्ययावत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीही क्रीडा संकुलातील सोयी-सुविधा वाजवी भाडे तत्त्वावर देऊन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याबाबतच्या कामांची सविस्तर माहिती दिली.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगली : ह्रदय शस्ञक्रियेसाठी 29 बालके मुंबईला रवाना
Next Article मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या आखणीत कार्यालये टाकताहेत कात !

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?