Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चंद्रकांत पाटील यांचा लोकसभा निवडणुकीबाबत खळबळजनक दावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

चंद्रकांत पाटील यांचा लोकसभा निवडणुकीबाबत खळबळजनक दावा

Surajya Digital
Last updated: 2021/01/08 at 1:46 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सिंधुदुर्ग : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजप 400 चा आकडा क्रॉस करणार. काँग्रेसला मात्र एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार” असा खळबळजनक दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्गमध्ये केला आहे. यावरुन त्यांना मोदी क्रेझवर आणखी खूप आत्मविश्वास असल्याचे दिसले.

चंद्रकांत पाटील हे कणकवलीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांना हात घालत काँग्रेसला धारेवर धरलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा जास्त मिळतील. भाजप 400 चा आकडा क्रॉस करेल. तर दुसरीकडे काँग्रेसला मात्र एका बसमध्ये बसवून नेता येतील इतकेच खासदार मिळतील,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या अस्तित्वाबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले. राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना आपण किती दिवस सत्तेत राहू हे माहिती नसल्याचे म्हणत त्यांनी आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे सूतोवाच केले.

यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांचे समर्थन केले. “संपूर्ण देशाने कृषी कायद्यांचे समर्थन केले आहे. हे कायदे सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र विरोधकांना आता जाग आली आहे. एका राज्यातली मूठभर लोकांच्या साथीने हे आंदोलन केले जात आहे,” असे विधान चंद्रकांत पाटलांनी केले. तसेच, संपूर्ण देश या कायद्याचं समर्थन करतो आहे, हे दाखवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता. झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून या प्रकरणी आपण निवडणूक आयोग आणि मुंबई हायकोर्टात धाव घेणार आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
या निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याऐवजी इलेक्‍ट्रॉनिक वोटिग मशिनवर हे मतदान घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #चंद्रकांतपाटील #लोकसभा #निवडणुकीबाबत #खळबळजनक #दावा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुण्यातील मंडईच्या शारदा गजानन मंदिरात चोरी, चोरीची ही दुसरी घटना
Next Article काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निष्ठावंतांना संधी द्या; काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?