Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पार्थ पवारांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल; चंद्रकांत पाटलांनी सस्पेन्स वाढवला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

पार्थ पवारांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल; चंद्रकांत पाटलांनी सस्पेन्स वाढवला

Surajya Digital
Last updated: 2020/10/01 at 5:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ट्वीट केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी पार्थ यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तर पार्थ पवारांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल सुरू असल्याचं सूचक वक्तव्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी सस्पेन्स वाढवला आहे. मात्र, पार्थ यांना भाजपत प्रवेश देणार का? यावर सावध भूमिका घेत अद्याप प्रस्ताव आला नाही, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी सावध पवित्रा घेतला.

पुणे पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाची आज सुरूवात झाली. चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यावेळी उपस्थित होती. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुका कोरोनामुळे कधी होतील, हे माहीत नाही. मात्र, भाजपनं तयारी सुरू केली आहे. निवडणूक जिंकता येणं हा उमेदवारीबाबत महत्त्वाचा निकष राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, पार्थ यांच्याबाबत सूचक आणि सावध बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरही कठोर शब्दांत टीका केली. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढता येणं शक्य नाही. तसेच आरक्षण हा राज्याचा प्रश्न आहे. हे 50 वर्षे सक्रिय राजकारणात असणाऱ्या शरद पवारांना माहिती नाही. हे त्यांचं अज्ञान असं म्हणणं धाडसाचं ठरेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #चंद्रकांतपाटील #पार्थपवार #सत्यमेवजयते #वाटचाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एकनाथ खडसे नाराजीच्या परमोच्च स्थानावर; लवकरच मोठी बातमी देण्याची घोषणा
Next Article सोलापुरात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे बंदच राहणार

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?