पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार जावं; असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावर “अमितभाईच्या पायगुणाने वैभववाडीतील 6 नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही”, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
“अमितभाईंच्या पायगुणाने वैभववाडीतील 6 नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल. मी काही भविष्यकार नाही” असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये एकेठिकाणी सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
खरं बोलले की झोंबते, अमित शाह खरं बोलले ते फार झोंबले त्यामुळे ज्याला ज्याला जसं जमलं ज्यांनी माईल्ड प्रतिक्रिया काढली, त्यांना दम दिला गेला. दुसऱ्या दिवशी त्याच माणसाने पुन्हा स्ट्रॉग प्रतिक्रिया द्यायची, त्यामुळे अमित शाह शिवसेनेबद्दल जे बोलले ते खरे होते, त्यामुळेच ते झोंबले.
* शिवसेना संपण्याची भाषा केली नाही
सिंधुदुर्गातील नगरसेवक शिवसेनेत जाणे आणि अमित शाह यांचे वक्तव्य याचा कसलाही संबंध नाही,अमित शाहांच्या पायगुणाने सरकार जाणार असेल ते जाईल अमित शाह यांनी शिवसेना संपण्याची भाषा केली नाही, पण मागच्या 15 महिन्यात ज्या पद्धतीने सरकारचा कारभार चालला आहे, तो आमच्या सरकार वेळी राहिला असता, तर शिवसेना संपली असती, असं वक्तव्य त्यांनी केले आणि ही वस्तूस्तिथी असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेला आणि संजय राऊतांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. भाजपला कुणाला घाबरण्याचे कारण नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“अमित भाईंनी शिवसेना संपवण्याची भाषा करण्यापेक्षा शिवसेनेला असा सल्ला देणं, आवाहन करणं किंवा सरकार आहे. तेव्हा जुने हिशेब काढण्याचा तो मुद्दा होता. तरीही शिवसेनेला आणि संजय राऊतांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यामुळे ते शिवसेनेला संपवणार, मसनात गेले, काय काय बोलले”.
अमित भाई असं व्यक्तीमत्व आहे, भाजप हा पक्ष असा आहे कुणाला घाबरत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
वैभववाडीमध्ये १७ पैकी १७ सदस्य भाजपचे आहेत, राणे साहेब भाजपचे नेते झाले, त्यांचा मुलगा आमदार झाले. १७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेत गेले हे जाणं येणं त्या त्या वेळी होत असतं.
* नारायण राणे म्हणाले होते
अमित शाहांच्या पायगुणाने मविआ सरकार जावं; असं नारायण राणे म्हणाले होते. त्याला शिवसेनेने सामनातून उत्तर दिलं होतं. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? असा सवाल सेनेने उपस्थित केला होता.