पुणे, 9 एप्रिल (हिं.स.)।
गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तालयाने काल राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर केलाआहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कडून नियमांची उल्लंघन झाले आहे का? याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी केली आहे. याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या अहवालात नेमकं काय आहे आणि राज्य सरकार काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ही चौकशी करण्यात आली आहे. राज्याचा आरोग्य विभाग महापालिकेची माता मृत्यू अन्वेषण समिती, धर्मादाय आयुक्तालय अशा तीन पातळीवर चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंतधर्मादाय आयुक्तालयाने राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर ठपका ठेवण्यात आला होता त्यामुळे आता धर्मादाय आयुक्तलयाने काय अहवाल दिला हे पाहावे लागेल. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात देखील रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता त्यामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर कारवाई करण्याचा निर्णय शासन स्तरावर काय होणार याकडे हे पाहणे महत्वाचे आहे.