Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पॉझिटिव्ह पे सिस्टम : पन्नास हजारांहून जादा रक्कमेच्या चेकसाठी नवीन पद्धत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

पॉझिटिव्ह पे सिस्टम : पन्नास हजारांहून जादा रक्कमेच्या चेकसाठी नवीन पद्धत

Surajya Digital
Last updated: 2020/09/28 at 10:24 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने फसवणूक रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आरबीआच्या माहितीनुसार, या सुविधेचा फायदा घेण्याचं खातेधारकावर अवलंबून आहे. मात्र ही पद्धत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि चांगली आहे.

येत्या 1 जानेवारी 2021 पासून चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) सुरु करणार असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. पॉझिटिव्ह पे सिस्टमअंतर्गत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी महत्त्वाच्या माहितीबाबतीत पुन्हा एकदा पुष्टी करण्याची गरज भासणार आहे. या सिस्टममध्ये चेक देणाऱ्याला एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम यांसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकबाबत आणखी माहिती द्यावी लागणार आहे.

यामध्ये तारीख, लाभार्थींचं नाव, प्राप्तकर्ता (पेई) आणि रकमेबाबत माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती असलेला चेक पेमेंटसाठी देण्याआधी पहिल्यांदा पडताळला जाईल. जर कोणत्या विसंगती आढळल्या, तर त्याची माहिती पेमेंट करणारी बँक आणि प्रस्तुत करणाऱ्या बँकेला दिली जाईल आणि त्यामधील त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी पावलं उचलली जातील.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आरबीआच्या माहितीनुसार, या सुविधेचा फायदा घेण्याचं खातेधारकावर अवलंबून आहे. बँक 5 लाख रुपये आणि त्यावरील जास्त रक्कम असणाऱ्यांसाठी ही सिस्टम अनिवार्य करु शकतात.

रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे की ही सिस्टम 1 जानेवारी 2021 पासून लागू होईल. ग्राहकांनी जागरुक राहावं असं बँकांनी एसएमएसद्वारे सांगितलं आहे. यासोबतच बँक आपल्या शाखांमध्ये, एटीएमसोबतच वेबसाईट आणि इंटरनेट बँकिंगवर याबाबत संपूर्ण माहिती देणार असल्याचेही सांगितले आहे.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #आरबीआय #पन्नासहजार #चेकसाठी #नवीनपद्धत #पॉझिटिव्हपेसिस्टम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महिलांसाठी आजपासून विशेष लोकल
Next Article भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?