पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संत तुकारामांनी महत्त्वाची भूमिका महत्त्वाची आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळेस अनेक अभंगाच्या ओळी म्हटल्या. The role of Saint Tukaram is important in the life of Chhatrapati Shivaji Maharaj – Narendra Modi Shila Mandir Dehu
मोदी म्हणाले, भारत ही संतांची भूमी आहे. तुकारामांचे अभंग प्रेरणा, दिशा देतात. सर्व संतांच्या अभगांनी प्रेरणा मिळते. शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका आहे. येवडच नव्हे तर स्वातंत्र्याच्या लढाईत जेव्हा वीर सावरकर यांना शिक्षा झाली, तेव्हा तुरूंगात ते तुकाराम महाराजांचे अभंग गात असत,” असंही मोदींनी यावेळी सांगितलं.
संत तुकाराम हे समाजच नाही तर भविष्यासाठीही आशाचे किरण बनून पुढे आहे. त्यांच्या अभंगाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही तोच अभंग असतो. आजही देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मुल्यांच्या आधारे पुढे जात आहे. संतांच्या अभंगातून रोज नवी प्रेरणा मिळते, असे मोदी यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी याठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाची महिनाभरापासून तयारी सुरु आहे. त्यामुळे सर्वांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. येथे उपस्थित वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. अखेर आज या मंदिराचे लोकार्पण झालं आहे. यावेळी वारकऱ्यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ शिळा मंदिराचा इतिहास
तुकोबारायांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर नदीकाठच्या दगडी शिळेवर बसून तुकोबारायांनी १३ दिवस अनुष्ठान केले. तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तुकाराम महाराज 13 दिवस त्या शिळेवर अनुष्ठानासाठी बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू येथील मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावे असा आग्रह वारकरी संप्रदायाचा होता. म्हणून देहूतील मुख्य मंदिरात ही स्थापीत केली असून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जात आहे.
□ शिळा मंदिराचे वैशिष्ट्य
नव्याने बांधलेले शिळा मंदिर संपूर्ण दगडात आहे. मंदिराला २ सुवर्ण कळस आहेत. मुख्य गाभारा, मंडप यासह मंदिराच्या चार कोपऱ्यावर चार कळस आहेत. तर मंदिरावर 36 कळस स्थापन करण्यात आले आहेत. शिळा मंदिरातील संत तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं असल्याने मूर्तीची उंची 42 इंच आहे. ही मूर्ती 42 दिवसांमध्ये साकारण्यात आली आहे. ही मूर्ती शिल्पकार चेतन हिंगे, पिंपरी चिंचवड यांनी तयार केली आहे.
□ अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान सुप्रिया सुळे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदींचं भाषण झालं. परंतु यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी मिळाली नाही. त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
□ उद्धव ठाकरे सुरक्षा रक्षकांवर संतापले, आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न!
मुंबई : मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरे यांना सुरक्षा रक्षकांकडून उतरवण्याचा प्रयत्न झाल्याने उद्धव ठाकरे सुरक्षा रक्षकांवर संतापल्याचे वृत्त आहे. प्रोटोकॉल आणि सुरक्षेच्या कारणावरून आदित्य यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे.