रायपूर, १८ ऑगस्ट – छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या भूसुरूंग (आयईडी) स्फोटात डीआरजी (राज्य गस्ती दल) चा एक जवान हुतात्मा झाला, तर तीन जवान जखमी झाले.
हा स्फोट इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाजवळ झाला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डीआरजी आणि राज्य पोलिसांचे संयुक्त पथक रविवारी नक्षलविरोधी मोहिमेत होते. याच दरम्यान नक्षलवाद्यांनी रस्त्यावर पेरलेले आयईडी फुटले.
बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी सांगितले की, बीजापूर डीआरजी पथकातील जवान दिनेश नाग यांनी या स्फोटात वीरमरण पत्करले. जखमी तिघा जवानांची प्रकृती स्थिर असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर अधिक चांगल्या उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.