मुंबई, 4 जुलै (हिं.स.) – भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि यांचे परिवारसह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे दुपारी १ वाजता आगमन झाले.
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर- पाटणकर, पोलीस आयुक्त, मुंबई देवेन भारती, विधी व न्याय विभाग प्रधान सचिव सुवर्णा केओले तसेच मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.