Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2021/03/06 at 10:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

भंडारा : लाखनी येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी महिलेने आज पहाटे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शितल अशोक फाळके (वय २८) असे या महिला अधिकार्‍यांचे नाव आहे. त्या मुळच्या सातारा येथील रहिवासी होत्या. त्या अविवाहित असून आपल्या आईसमवेत लाखनी येथील माणिक निखाडे यांच्या घरी भाड्याने रहात होत्या.

बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लाखनी येथे आज शनिवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास उघडकीस आली. त्यांनी भाड्याच्या घरातील बाथरूममध्ये ओढणीने गळफास लावून घेतला. त्या ३० जून २०१७ पासून लाखनी येथे कार्यरत होत्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्या अविवाहित असून आईसोबत येथील माणिक निखाडे यांच्या घरी भाड्याने राहत होत्या. शनिवारी पहाटे बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या आईला दिसल्या. या घटनेची माहिती तात्काळ लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला. त्यावेळी सुसाईड नोट आढळून आली. त्यात त्यांनी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करत असून आई मला माफ कर असे लिहिलेले आहे.

* काही दिवसांपासून तणावात

शीतल फाळके काही दिवसांपासून तणावात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी त्या कार्यालयात रडत असल्याचे सांगण्यात आले. मृदू आणि प्रेमळ स्वभावाच्या शितल कर्मचाऱ्यांत प्रिय होत्या. त्यांच्या आत्महत्येने जिल्ह्याच्या शासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

शितल फाळके या गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे त्यांच्याबरोबर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी त्या कार्यालयात रडत असल्याचे काही जणांनी पाहिले होते. मात्र, त्यामागील कारण त्यांनी कोणाला सांगितले नव्हते. त्यानंतर आज सकाळी सर्वांना त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यावर कर्मचार्‍यांना धक्का बसला.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #ChildDevelopment #ProjectOfficer #commits #suicide #strangulation, #बालविकास #प्रकल्पअधिकारी #महिलेची #गळफास #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरमधील रात्रीची संचारबंदी वाढवली, शाळा – महाविद्यालये 14 मार्चपर्यंत बंद
Next Article ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन, अर्धशतकाहून अधिक काळ गाजवला

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?