Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात स्मार्टसिटीच्या ट्रॅक्टरखाली चेंगरून दत्तचौकात बालकाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात स्मार्टसिटीच्या ट्रॅक्टरखाली चेंगरून दत्तचौकात बालकाचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/06/10 at 9:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : शहरातील स्मार्टसिटी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावरील ट्रॅक्टरच्या खाली चेंगरून एका शाळकरी मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर शहरातील दत्त चौकात घडली.

मुंबईत इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी https://t.co/acr2dpt60m

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021

सोलापूर शहरात स्मार्टसिटीची सर्वत्र अर्धवट असलेली कामं, झालेली खोदाई, न बुजवलेले खड्डे, त्यातच अनलॉकमुळं शहरात वाढलेली वर्दळ आणि अस्ताव्यस्त पार्किंग याचा बळी ठरला. दत्तचौक ते लक्ष्मी मार्केट रस्त्यावर शुभराय टॉवर समोर हा अपघात घडला.

समर्थ धोंडीबा भास्कर ( वय १३,  उत्तर कसबा, पंजाब तालीम, सोलापूर) असे ट्रॅक्टरखाली चेंगरून ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेतून विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चहावाल्याकडून मोदींना दाढी कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनीऑर्डर, वाचा त्या चहावाल्याने पाठवलेले पत्र https://t.co/HuFtZVWFc1

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021

स्मार्टसिटी योजनेत रस्त्याचं काम या परिसरात गेली दीडवर्ष सुरु आहे. यासाठी आजोरा आणि मजूर घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून सायकलवर निघालेला समर्थ जागीच ठार झाला.

ट्रॅक्टर आणि सायकल चालक दोघेही लक्ष्मीमार्केटच्या दिशेनं निघाले होते. ट्रॅक्टरला एक ट्रॉली होती. ट्रॅक्टरचं मागील चाक आणि ट्रॉली याच्यामध्ये सापडून सायकलस्वार चाकाखाली चिरडला गेला. अनेकांनी हा अपघात पाहिला. सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलीसांना बोलाविण्यात आलं. तोपर्यंत परिसरात मोठी गर्दी झाली होती.

…त्यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, शरद पवारांच्या भाषणाचे अनेक अर्थ https://t.co/l6oEg3tjov

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021

दरम्यान स्मार्टसिटीचं कामं अर्धवट आणि बेशिस्त आहे. शहरात अपघात वाढलेत आजच्या अपघात प्रकरणी स्मार्टसिटीचे त्र्यंबक डेंगळे – पाटील यांच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयास पाठविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाणे करीत आहे. पोलीसांनी ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतलं आहे. तो देगांव येथील रहिवासी आहे. फौजदार चावडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार संबोधित करताना #ncp #surajyadigital #sharadpawar #राष्ट्रवादीhttps://t.co/7UwVW6JSZs

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Childdies #falling #SmartCity #tractor #Solapur, #सोलापुरात #स्मार्टसिटीच्या #ट्रॅक्टरखाली #चेंगरून #दत्तचौकात #बालकाचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article …त्यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, शरद पवारांच्या भाषणाचे अनेक अर्थ
Next Article लस घेतल्यानंतर शरीरात आले चुंबकत्व, आरोग्य तज्ज्ञांनी दावा फेटाळला

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?