Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर | खेळता – खेळता घरासमोरील हौदात पडल्याने चिमुकलीचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर | खेळता – खेळता घरासमोरील हौदात पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2023/03/03 at 9:37 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

पंढरपूर – घरासमोरील हौदामध्ये पडल्यामुळे तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची  घटना तालुक्यातील देगाव येथे घडली. Pandharpur | Child dies after falling into well in front of house while playing, Solapur

Contents
》 लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; तरुणीशी नैसर्गिक व अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून अत्याचारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 रस्त्याच्या कडेला उभारणे शेतक-याच्या जीवावर बेतले; नागरिकांनी मोठमोठ्याने ओरडूनही उपयोग झाला नाही

 

या घटनेमध्ये राजश्री मोहन घाडगे या तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. देगाव येथे राहणाऱ्या मोहन घाडगे यांची मुलगी राजश्री आज शुक्रवारी दुपारी घरासमोर खेळत होती. यावेळी घाडगे कुटुंबातील सदस्य शेतीच्या कामात व्यस्त होते. राजश्री ही खेळता खेळता घरासमोरील हौदात पडली त्यावेळी तिच्याकडे कोणाचेच लक्ष न गेल्यामुळे पाण्यात बुडून तिचा अंत झाला.

दरम्यान या घटनेमुळे घडगे कुटुंबावर शोक काळा पसरली असून देगाव मध्ये देखील हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

》 लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; तरुणीशी नैसर्गिक व अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून अत्याचार

 

सोलापूर : तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिच्या फिर्यादीवरून रोहित प्रकाश जाधव (वय-२५,रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, रोहित जाधव याने दि.२० फेब्रुवारी २०२२ ते १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत एका तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने सोलापुरात वेळोवेळी पीडित तरूणी विरोध करत असताना देखील त्या तरुणीशी नैसर्गिक व अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला आहे, अशा आशयाची फिर्याद पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.

या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दराडे हे करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 रस्त्याच्या कडेला उभारणे शेतक-याच्या जीवावर बेतले; नागरिकांनी मोठमोठ्याने ओरडूनही उपयोग झाला नाही

 

सोलापूर : रस्त्याच्या कडेला थांबणे एका वृद्ध शेतकऱ्याच्या जीवावर बेतले आहे.आनंदा विश्वनाथ गरड (वय 67 वर्ष, रा. रानमसले, ता. उ. सोलापूर) असे या मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

 

मळी वाहतूक करणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांना शेतक-याचा मृत्यू झालाय. या अपघाताप्रकरणी मळी टँकर चालकाच्या विरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता.2) सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी टँकरचालकाविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम दयानंद गरड (वय २८) याने दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश अर्जुन सेनमारे (वय ३४, रा. नरखेड, ता. मोहोळ) या टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोकरे हे करीत आहेत. आनंदा विश्वनाथ गरड (वय ६७, रा. रानमसले, ता. उ. सोलापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मयत आनंदा गरड हे रानमसले-बीबीदारफळ रोडवर रस्त्याच्या कडेला थांबले होते. याचवेळी टँकरचालकाने आनंदा गरड यांना धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.

 

त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येेथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली असून अधिक तपास सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. मयत आनंदा गरड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.

अपघात झाल्यानंतर १०० मीटरपर्यंत टँकरचालक तसाच पुढे निघून जात होता. नागरिकांनी मोठमोठ्याने ओरडून त्याला थांबविले. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी अपघातात जखमी झालेल्या आनंदा गरड यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले. घटनेनंतर संतप्त जमावाने टँकरच्या काचा, हेडलाईट फोडून संताप व्यक्त केला.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Pandharpur #Childdies #falling #well #front #house #playing #Solapur, #पंढरपूर #खेळता-खेळता #घरासमोरील #हौद #पडली #चिमुकली #मृत्यू #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मनसेकडून चौकशीची मागणी; राज ठाकरे भेटीला, प्रतिक्रिया पाहता राजकीय वादाची पार्श्वभूमी…
Next Article महाराष्ट्रात पुढील 2 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार !

Latest News

crime
मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले
देश - विदेश June 26, 2025
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृदय सत्कार
देश - विदेश June 26, 2025
उत्तराखंड : प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता, बचावकार्य सुरु
देश - विदेश June 26, 2025
मेक्सिको : धार्मिक उत्सवादरम्यान गोळीबार,१२ जणांचा मृत्यू तर २० जखमी
देश - विदेश June 26, 2025
अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार
महाराष्ट्र June 26, 2025
दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील – राजनाथ सिंह
देश - विदेश June 26, 2025
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन
महाराष्ट्र June 26, 2025
अहिल्यानगर : सारडा विद्यालयात विद्यार्थ्याने केली हत्या
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?