Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मारहाणप्रकरणात आईने सरकार पक्षाच्या विरोधात दिली साक्ष; तरीही मुलास सक्त मजुरीची शिक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मारहाणप्रकरणात आईने सरकार पक्षाच्या विरोधात दिली साक्ष; तरीही मुलास सक्त मजुरीची शिक्षा

Surajya Digital
Last updated: 2022/08/05 at 9:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : आईस मारहाण केल्याची तक्रार स्वतः आईने पोलीस ठाण्यात दिली परंतु हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आईने पोटच्या मुलाला शिक्षा होण्याच्या भीतीने सरकार पक्षाच्या विरोधात साक्ष दिली. तरीही साक्षीदारांनी दिलेली साक्ष व वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर औटी यांनी आईस मारहाण केल्याप्रकरणी मुलास सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. In the beating case, the mother testified against the government party; Still the child is sentenced to forced labor by the Solapur court

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ शेटफळ येथे शेतात विष पिऊन आत्महत्या□ उलट्या झाल्याने विवाहितेचा मृत्यू

 

या घटनेची हकीकत अशी की,दि.२७ मे २०२० रोजी शारदा माधव परांजपे (वय -७३,रा. राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर) यांना त्यांचाच मुलगा मंगेश परांजपे (रा.राजस्व नगर,सोलापूर) यांनी कु-हाडीने मारहाण करून जखमी केली. आईने विजापूर नाका पोलीसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला होता.

 

या गुन्हाचा तपास सपोनि बी.एच.पाटील व पोसई बेंबडे यांनी केला. सपोनि बी.एच.पाटील यांनी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. याप्रकरणी एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले होते. परंतु आरोपीच्या आईने पोटच्या मुलाला शिक्षा होऊन त्यास कारागृहात जावे लागेल या भीतीने आईनै न्यायालयात सरकार पक्षाच्या विरुद्ध साक्ष दिली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

पीएसआय बेंबडे यांनी फिर्यादी यांची सिव्हील हॉस्पीटल येथे नोंदविलेल्या फिर्यादी जबाबाप्रमाणे साक्ष दरम्यान कथन केले. तसेच आईने उलट साक्ष दिली असली तरी घराशेजारील प्रत्यक्ष घटना पाहणारे साक्षीदाराने सत्य वस्तुस्थिती न्यायालयात कथन केले. त्यामुळे इतर प्रत्यक्ष साक्षीदारांनी दिलेला पुरावा व वैद्यकीय पुराव्याच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर औटी औटी यांनी आरोपी मंगेश परांजपे यास ६ महिने सक्तमजुरी व २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या गुन्ह्याचे तपासकामी पोकॉ.स्वामी व सोनटक्के यांनी मदत केली आहे. यात सरकारी वकील नागनाथ गुंडे यांनी काम पाहिले असून, त्यांना पैरवी अंमलदार म्हणून मपोना.एस.एस.घाडगे यांनी कामकाज केले.

 

□ शेटफळ येथे शेतात विष पिऊन आत्महत्या

शेटफळ (ता.मोहोळ) येथील भांगे यांच्या शेतात कामाला गेल्यानंतर विष प्राशन केल्याने सचिन बलभीम इंगळे (वय २२ रा. सिध्देवाडी (ता.मोहोळ) हा उपचारादरम्यान मरण पावला. काल गुरुवारी (ता.4) सकाळी हा प्रकार घडल्यानंतर त्याला मोडनिंब येथे प्राथमिक उपचार करून अनिल(भाऊ) यांनी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान तो मरण पावला अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

□ उलट्या झाल्याने विवाहितेचा मृत्यू

 

रोपळे (ता.माढा) येथे राहणाऱ्या स्वाती संतोष भोंग (वय ३०) यांना उलट्या झाल्याने त्या उपचारा दरम्यान काल गुरुवारी (ता.4) सकाळी मरण पावल्या.२९ जुलै रोजी त्यांना उलट्याची लागण झाली होती. त्यांना कुर्डूवाडी येथे आणि सोलापुरात खाजगी रुग्णालयात उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.

 

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #beating #case #mother #testified #government #party #Still #child #sentenced #forcedlabor #bySolapur #court, #मारहाण #प्रकरणात #आई #सरकारपक्ष #विरोधात #साक्ष #मुलास #सक्तमजुरी #शिक्षा #सोलापूर #न्यायालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामपंचायत निकाल : 9 ग्रामपंचायतीवर भाजप तर 4 वर ठाकरेंची बाजी, काँग्रेसचा दारूण पराभव
Next Article मठाधिपतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल, बेदम मारहाण, पुण्यात उपचार सुरू

Latest News

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी
Top News July 1, 2025
रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी
देश - विदेश July 1, 2025
राजदंड उचलण्याचा प्रयत्न, नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
Top News July 1, 2025
ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन
देश - विदेश July 1, 2025
पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
Top News July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?