Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । अभय योजनेतून 11 कोटींचा मिळकत कर वसूल,  शेवटच्या दिवशी पाच हजाराच्या चिल्लरचा भरणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर । अभय योजनेतून 11 कोटींचा मिळकत कर वसूल,  शेवटच्या दिवशी पाच हजाराच्या चिल्लरचा भरणा

Surajya Digital
Last updated: 2022/12/16 at 12:11 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● ८ दिवसात ९ शाळा- महाविद्यालय कार्यालय आणि १३ गाळे सील

● मोहिमेतून ११ कोटींचा कर महापालिकेच्या तिजोरीत

Income tax collection of 11 crores from Abhay Yojana, payment of chiller of five thousand on the last day
Solapur Municipal Corporation

Contents
● ८ दिवसात ९ शाळा- महाविद्यालय कार्यालय आणि १३ गाळे सील● मोहिमेतून ११ कोटींचा कर महापालिकेच्या तिजोरीतस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ लिलावाची पुढील कार्यवाही करण्यात येणार !○ पाच हजाराची चिल्लर देऊन कर भरणा

सोलापूर :  महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेली नोटीस फी, दंड आणि शास्तीमधील ८० टक्के सूट देणारी विशेष अभय योजना गुरुवारी (ता. 15) मुदत संपल्याने ती आज शुक्रवार, १६ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अभय योजनेच्या शेवटच्या दिवशी रात्री ११ .१८ वाजेपर्यंत ४.१३ कोटी मिळकत कर वसूल झाला आहे. ८ दिवसात ९ शाळा – महाविद्यालय कार्यालय आणि १३ गाळे सील केली. मोहिमेतून ११ कोटींचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आता संपूर्ण दंडाच्या रकमेसह थकीत मिळकत कर वसूल करण्यात येणार आहे.

 

सोलापूर महापालिकेच्या मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष पथकामार्फत शहरात मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या ८ दिवसाच्या मोहिमेत मिळकती सील आणि जप्ती कारवाईसह वसूल करण्यात आलेला ११ कोटी रुपयांचा थकीत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आता संपूर्ण दंडाच्या रकमेसह थकीत मिळकत कर वसूल करण्यात येणार आहे, महापालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली

आता शुक्रवारपासून संपूर्ण दंडाच्या रकमेसह थकीत मिळकत कर वसूल करण्यात येणार असल्याचे व कारवाई मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली. महापालिकेच्या मिळकत कराची जुनी आणि चालू आर्थिक वर्षातील ६३६ कोटींची थकबाकी असल्याने महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने प्रथम ३ लाखावरील थकबाकी मिळकतदारांना मिळकतीशील व जप्ती कारवाई संदर्भात नोटीसा बजावल्या होत्या. मात्र नोटीसा मिळूनही सुमारे १ हजार २०० मिळकतदारांपैकी केवळ ३० मिळकतदारांनी आपला सुमारे ४ कोटी रुपयांचा थकीत कर जमा केला होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

यामुळे महापालिका प्रशासनाने थकबाकी मिळकतदारांना त्यांचा कर भरण्यास आकर्षित करण्यासाठी दि. १२ नोव्हेंबरपासून लावण्यात आलेल्या नोटीस फी, दंड आणि शास्तीमध्ये ८० टक्के सूट देण्याची विशेष अभय योजना जाहीर केली होती. प्रथम मुदत संपल्याने यामध्ये वाढ करून १५ डिसेंबरपर्यंत केली होती. ही योजना गुरुवारी विशेष आदेशाने रद्द करण्यात आली आहे. महापालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ व सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून  पथकाने हे वसुली मोहीम राबवली.

 

□ लिलावाची पुढील कार्यवाही करण्यात येणार !

योजनेसह कराची वसुली करताना पथकाने शहरातील ९ शाळा- महाविद्यालय तसेच १३ गाळे सील केले. यादरम्यान तब्बल ११ कोटी २० लाख ६६ हजार ३८३ रुपयांचा कर वसूल केला आहे. आता यापूर्वी सीलबंद आणि जप्त करण्यात आलेल्या मिळकतींची मुदतीत १०० टक्के दंडासह थकबाकी महापालिकेत जमा न झाल्यास लिलावाची पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपायुक्त पोळ यांनी स्पष्ट केले.

○ पाच हजाराची चिल्लर देऊन कर भरणा

अभय योजनेच्या गुरुवारी शेवटच्या दिवशी एका मिळकतदाराने तब्बल ५ हजार रुपयांची चिल्लर देऊन महापालिका मिळकत कराचा भरणा केला. उशिरापर्यंत महिला कर्मचाऱ्यास चिल्लर मोजावी लागली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Income #tax #collection #11crores #AbhayYojana #payment #chiller #fivethousand #lastday #Solapur #MunicipalCorporation, #सोलापूर #महापालिका #अभय #योजना #11कोटी #मिळकत #कर #वसूल #शेवटच्यादिवशी #पाचहजार #चिल्लर #भरणा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मग पॉर्नसारखी गोष्ट कशी सहन करता; अभिनेत्री पायलचा ‘पठाण’मधील बिकनीला सपोर्ट
Next Article सोलापूर । विजेचा शॉक बसल्याने तरुणीचा मृत्यू, लॅब टेक्निशियन बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?