Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चोरट्यांचा प्लॅन पोलिसांमुळे फसला, केली दगडफेक; पोलिस, होमगार्डसह तिघे जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

चोरट्यांचा प्लॅन पोलिसांमुळे फसला, केली दगडफेक; पोलिस, होमगार्डसह तिघे जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/11/15 at 3:09 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

श्रीपूर : श्रीपूर येथे मध्यराञीच्या सुमारास १० ते १५ चोरट्यांनी किराणा मालाचे दुकान फोडून मोठी चोरी करण्याचा प्रयत्न केला असता सावध पोलिसांनी हा डाव उधळून लावला. मात्र यात चोरट्या समूहाने केलेल्या दगडफेकीत पोलिस, होमगार्डसह तिघे जखमी झाले आहेत.

पोलिस कर्मचारी धनंजय झगडे यांच्यासह पोलिसावर चोरट्यांनी दगडांचा वर्षाव करुन पळ काढला. दगडांचा मार लागून पोलिस कर्मचारी धनंजय एकनाथ झगडे डोक्याला मार लागून जखमी झाले आहेत तर, होमगार्ड सागर पवार, पोलिसमिञ अनिकेत यादव, विनोद कडलासकर, कुलकर्णी हे किरकोळ जखमी झाले आहेत.

अधिक वृत्त असे की दीपावली सणाच्या काळात सोलापूर जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. महत्त्वाच्या रोडवर जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. अशीच नाकाबंदी श्रीपूर शिवाजी चौक येथे रात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचारी धनंजय झगडे यांनी होमगार्ड सागर पवार पोलीस मित्र अनिकेत यादव विनोद कडलास्कर व कुलकर्णी यांच्यासमवेत नाका-बंदी लावली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रात्री दोनच्या सुमारास येणारी-जाणारी वाहने तपासणी करत असताना शिवाजी चौकातून खंडाळीकडे जाणाऱ्या रोडवर शिवाजी चौकाजवळ असणाऱ्या एका होलसेल किराणा दुकानाचे शटर उचकटून काढत असल्याचा आवाज येऊ लागल्याने पोलीस कर्मचारी धनंजय झगडे आणि इतर चौघे आवाजाच्या दिशेने किराणा दुकानाकडे जाऊ लागले असता बारा ते पंधरा चोरट्यांना पोलिसांची चाहूल लागल्याने आणि पोलिस येत असल्याचे लक्षात आल्याने चोरटे सावध झाले. अंधारात दुकानाच्या एका बाजूला दहा ते बारा चोरटे लपले , दुसर्‍या बाजूला अंधारातच तीन जण उभे राहिले. धनंजय झगडे यांनी दुकानाचे पाहणी केली असता चोर चोरी करण्यासाठी आले असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी चार जणांचे पथक करून दुकानाच्या पाठीमागे अंधारात पाहण्यास गेले असता हे सर्वजण अंधारात चोरांचा तपास करत असताना त्यांच्यावर 12 ते 13 चोरट्यांनी दगडांचा हल्ला केला. त्यामध्ये डोक्याला हाताला पायाला दगडांचा मार लागला तर दुसरीकडे दुकानाच्या दुसऱ्या बाजूला धनंजय दगडे यांना अंधारातच काही अंतरावर चोरटे उभा असल्याचे दिसून आल्याने काही क्षणातच त्यांनी उडी मारून एकाला पकडले व दोन जण तेथून पळून गेले.

पकडलेल्या चोरावर पकड घट्ट करून त्याच्या छातीवर बसून त्याला जोरदार मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी इतर दहा ते बारा चोरट्यांनी टॉवेलमध्ये बांधलेल्या दगडाच्या गाठीने धनंजय दगडे याच्यावर मारा केल्याने आणि ते एकटे पडल्याने काही क्षणात त्या चोराला झगडे याच्या पकडीतून सोडून ‘जल्दी भागो, जल्दी भागो’ असा आवाज देत चोरट्यांनी तेथून पळ काढला.

श्रीपूर येथील चोरांच्या हल्ल्याची घटना अकलूज पोलीस स्टेशन येथे कळताच अकलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, सपोनि नागेश यमगर हे पोलीस फौजफाट्यासह तातडीने श्रीपूर येथे येऊन पहाटेपर्यंत पोलीस चोरट्यांचा या परिसरात कसून तपास करीत होते. पण त्यांच्या हाती काहीही लागले नाही. पोलिसावरील हल्ल्याची अज्ञातविरुद्ध अकलूज पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #चोरट्यांचा #प्लॅनपोलिसांमुळे #फसला #केलीदगडफेक #पोलिसहोमगार्डसह #तिघेजखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ पुन्हा चर्चेत; चाहत्यांकडून हटके भाष्य
Next Article श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शनासाठी उद्या दारं उघडणार, मात्र या राहणार सरकारच्या गाडलाइन्स

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?